अनैतिक संबंधातून तरुणाचा खून.

Rahul
2 Min Read

पतीने काढला पत्नीच्या प्रियकराचा काटा.
देवग्राम येथील घटना.
गुरुवारला घडली घटना.
शुक्रवारी पहाटे आली उघडकीस.
दगडाने ठेचून केला खून..
पोलिस आरोपीच्या शोधात.
शरद उत्तमराव गवळी असे मृत व्यक्तीचे नाव.
किशोर बालाजी सावलकर असे आरोपीचे नाव.

नरखेड प्रतिनिधी:-

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून झाल्याची घटना नरखेड तालुक्यातील देवग्राम येथे गुरुवारी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघड झाली आहे.शरद उत्तमराव गवळी वय वर्ष 36 रा. देवग्राम असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर किशोर बालाजी सावलकर वय वर्ष 45 वर्ष रा. दहीगोंडा ता. धारणी असे आरोपींचे नाव आहे.

आरोपी किशोर सावलकर व त्याची पत्नी कामाच्या शोधात तीन वर्षापूर्वी देवग्राम येथे आले होते. आरोपी व त्याची पत्नी शेतात रोज मजुरीचे काम करत होते. शरद गवळी हा बकऱ्या चारायचे काम करत होता. शरदचे आरोपीच्या पत्नीसोबत सूत जुळले व त्या दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली. आरोपीची पत्नी व शरद लपून एक मेकांना भेटायचे. या गोष्टीची भनक महिलेच्या पतीला लागली होती. त्यामुळे तीन महिन्यापूर्वी आरोपी आपल्या पत्नीला व मुलांना घेऊन रातोंरात देवग्राम येथून पळून गेला. गुरवारी शरद बकऱ्या चारायला नदीकाठी गेला होता. सायंकाळी बकऱ्या घरी परतल्या पण शरद घरी न आल्याने घरच्यांनी व गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. गावकऱ्यांनी शरदचा शोध घेणे सुरूच ठेवले होते. शुक्रवारी पहाटे शरदचा मृतदेह एका शेतात तुरीच्या झाडाखाली आढळून आला. शरदचा चेहरा पूर्णपणे ठेचलेला व रक्तनाने भरलेला होता. गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसाना दिली. माहिती मिळताच ठाणेदार तुषार चव्हाण आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळी पोहचले व त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शव विच्छेदन गृहात पाठवला. आरोपी किशोर बालाजी सावलकर
विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *