वन विभाग बदली प्रक्रियेत स्थानिक कर्मचारी यांची चांदी

Rahul
1 Min Read

* वनविभाग वर्धा येथील स्थानिक कर्मचारी यांच्या मनमर्जीत बदली.
* राजकारणात राजकीय डावपेच खेळणारे कर्मचारी यांची संपूर्ण सेवा एकाच तालुक्यात.
* वन विभाग वर्धा येथील आष्टी तालुक्यातील स्थानिक कर्मचारी अनेक वर्षापासून तालुक्यातच…
वर्धा (प्रतिनिधी) :-
राज्य शासनामार्फत प्रत्येक वर्षी राज्य कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बदलीचे सत्र नित्यनेमाने भ्रष्टाचार विरहित कामकाज चालवणे करिता नियमित चालू असते परंतु या साखळीला अपवाद म्हणून वन विभाग वर्धा ठरत आहे.
सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की, वन विभाग वर्धा येथे शासकीय नियमानुसार वर्ग 3 च्या कर्मचारी बदली प्रक्रिया चालू असताना स्थानिक कर्मचारी आपले राजकीय वरदस्त वापरून अनेक वर्षापासून आपल्या जन्म तालुक्यात कर्तव्य बजावत असून शासकीय कामात राजकीय तसेच कामाप्रती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करीत आहे. सदर प्रकार वर्धा वळून विभागातील आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असून तालुक्यात असणारे स्थानिक कर्मचारी अनेक वर्षापासून आष्टी तालुक्यात आपले कर्तव्य बजावत असून बदली प्रक्रियेत आपले राजकीय बळ वापरून वन विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून तालुक्यातच बदली करून घेतात असाच प्रकार या वर्षी सुद्धा बदली प्रक्रियेत होणार काय याकडे तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे, तर वर्धा वन-विभागातील उपवनसंरक्षक हरविंदर सिंग यांची भूमिका राजकीय वरदस्त असलेल्या कर्मचारी यांना धडा शिकवणारी असणार की यांच्यापुढे गुडघे टेकनारी असणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *