वर्धा वन विभाग बदली प्रक्रियेत उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांनी अखेर टिकविले गुडघे!

Rahul
2 Min Read

* आष्टी वनपरिक्षेत्र परिसरात स्थानिक वनरक्षक यांचा बोलबाला.
* वर्धा वन विभागात बदली प्रक्रियेत नियमाला बगल.
* आष्टी वनपरिक्षेत्र कार्यालय येथील स्थानिक कर्मचारी यांना प्राधान्यक्रम नसताना सुद्धा सोयीच्या                ठिकाणी बदली.
* बदली प्रक्रियेत आर्थिक देवाण-घेवान जोरदार चर्चा.

* कर्मचारी समुपदेशन फक्त देखाव्यापुरते.
वर्धा प्रतिनिधी-
वर्धा वनविभागात वनरक्षक बदली प्रक्रियेत राजकीय वरदस्त व आर्थिक देवाण-घेवाण करून बदली प्रक्रिया राबवली असल्याची जोरदार चर्चा वर्धा जिल्ह्यात सुरू आहे.
सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की, प्रशासकीय बदलीचा काळ हा शासकीय नियमानुसार दरवर्षी माहे एप्रिल ते मे महिन्याच्या शेवटचा आठवडा इतका असतो, त्यानुसार वर्धा वन विभागात गट क (वनरक्षक )पदाच्या बदल्या करण्यात आल्या असून बदली करिता समुपदेशन प्रक्रिया राबवली परंतु उपवनसंरक्षक हरबीर सिंग यांनी समुपदेशन हे फक्त दाखविण्यापुरते घेतले असे झालेल्या बदली प्रक्रियेतून दिसून येत आहे. वर्धा वन विभागात तील स्थानिक कर्मचारी यांचा राजकीय बोलबाला असल्याने नागरी सेवा समिती पदाधिकारी उपवन संरक्षक वर्धा हरवीर सिंग ( प्रादेशिक), उपवनसंरक्षक सुहास बडेकर (सामाजिक ), उपवनसंरक्षक ठेंगडी (वन्यजीव ), या समितीने स्थानिक कर्मचारी यांना सोयीच्या ठिकाणी बदली दिली असे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात चर्चा आहे की सदर प्रकार हा आर्थिक देवाण-घेवाण मधून झाला आहे. आष्टी वनपरिक्षेत्र परिसरातील काही कर्मचारी आष्टी तालुक्यातील रहिवासी असून मागील अनेक वर्षापासून ते एकाच तालुक्यात राजकीय वरदस्त वापरून आपली सेवा देत आहे. या सर्व प्रकारावरून दिसून येत आहे की उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांनी स्थानिक कर्मचाऱ्या पुढे गुडघे टेकलेले आहे. वर्धा वन विभागाचे जिल्हा विभाग प्रमुख आष्टी तालुका च्या स्थानिक कर्मचारी यांच्यासमोर शून्य ठरल्याची कुजबुज मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
            क्रमश :

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *