आष्टी तालुक्यातील घरकुल धारकांना तब्बल 932 ब्रास वाळूचे मोफत वाटप,सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न होतेय साकार*

Rahul
1 Min Read

*आष्टी तालुक्यातील घरकुल धारकांना तब्बल 932 ब्रास वाळूचे मोफत वाटप,सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न होतेय साकार*

* घरकुल धारकांना एकट्या तळेगांव मध्ये मिळाली 557 ब्रास मोफत वाळू 

* जप्त केलेल्या वाळू साठ्यावरून सुद्धा 12 ब्रास वाळूचे घरकुल धारकांना वाटप

* घरकूल धारकांनी मानले तहसीलदार व प्रशासनाचे आभार

 

वर्धा : सर्वसामान्य माणसांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आष्टी तालुक्यात ने कंबर कसली असून आष्टी तालुक्यातील एकूण घरकुलधारकांना तब्बल 932 ब्रास वाळूचे मोफत वाटप करण्यात आलेले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आष्टी तालुक्याचा कणा समजला जाणाऱ्या तळेगाव श्यामजी पंत या शहरांमध्ये तब्बल 557 ब्रास वाळू घरकुलधारकांना मोफत देण्यात आली आहे तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आशे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार होताना दिसून येत आहे घरकुलधारकांना रेती वाटपाची कार्यवाही अद्यापही सुरू असून नुकत्याच शासकीय लिलावात झालेले सातही वाळूघाटातून सुद्धा हा मोफत वाळूचा साठा घरकुलधारकांना देणे सुरू आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जप्त केल्या वाळू साठ्यातून सुद्धा 12 ब्रास वाळूचे वाटप घरकुलधारकांना करण्यात आले असल्याने सर्वसामान्य नागरिक प्रशासनाचे आभार व्यक्त करताना दिसून येत आहे ठीक ठिकाणी घरकुलधारकांच्या घरापुढे वाळू दिसत असल्याने त्यांच्या घराच्या कामाला आता गती आलेली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *