*कर्जबाजारीपणाला कंटाळून
तालुका प्रतिनिधीध:-नराज पवार
–आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण भागातील सुभाषनगर येथील शेतकरी पांडुरंग शंकर राठोड वय 45 यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नऊ वाजता सुमारास उघडकीस आली.मागील काही वर्षांपासून सततची नापिकी,वाढता कर्जबोजा या आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नातेवाईकांनी सांगितले,बँक ऑफ महाराष्ट्र या बँक शाखेचे पीककर्ज आणि खाजगी सावकारांचे कर्ज अशा दुहेरी आर्थिक दबावामुळे राठोड हे गंभीर संकटात सापडले होते.आज सकाळी कुटुंबियांना शेतात पाठवल्यानंतर त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले.मृतकाच्या मालकीची सुमारे तीन एकर कोरडवाहू शेती असून उत्पन्नाचा भरोसा नसल्याने कर्जाचा ताण वर्षानुवर्षे वाढत गेला.या आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर पडता न आल्याने अखेर त्यांनी जीवन संपवण्याचा मार्ग स्वीकारला.घटनेची माहिती मिळताच पारवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्णीकडे रवाना करण्यात आला.ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून पांडुरंग राठोड यांची आत्महत्या या सत्रात आणखी एक वेदनादायी भर घालणारी ठरली आहे.त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा अप्त परिवार आहे.