कोनाथा येथे तालुका स्तरारीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Rahul
1 Min Read

हिंगोली/ रुपेश एंगडे

         वसमत तालुक्यातील कोनाथा येथे तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक २६-११-२५ रोज बुधवारी सांस्कृतिक भवन, कोनाथा या ठिकाणी करण्यात येणार आहे. अशी माहिती कोनाथा गावचे सरपंच राजरतन सुभाषराव कुंटे यांनी दिली आहे.

      माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धेचा विषय ‘तरुणांना राजकारणातील संधी’ हा असेल शाळेतील अथवा महाविद्यालयातील केवळ एक विध्यार्थी या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतो. संबंधित स्पर्धाकाने शाळेच्या मुख्याध्यापकाचे , महाविध्यालयाच्या प्राचार्याचे पत्र आणणे बंधनकारक असेन. स्पर्धेचे प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे ५०००/- ३०००/- २०००/- रुपये व प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे या स्पर्धेची नाव नोंदणी जि.प.शाळा कोनाथा मुख्यद्यापक बेग सर-८४५९४९०२९०,ग्रामविकास अधिकारी-८७६६८७३६०४,उपसरपंच-८८५६८८३८८४, रोजगार सेवक-९९२१९७५२२९, पत्रकार बेंडे-९७६७४२६०११ इत्यादी नंबर वर अधिक माहिती साठी संपर्क साधावा असे अहवान कोणाथा येथिल सरपंच राजरतन कुंटे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *