सुंद्यामाता नगर, कात्रज येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Rahul
2 Min Read

कात्रज प्रतिनिधी:- कांताभाऊ राठोड

२२ नोव्हेंबर रोजी स्पार्क सोशल एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी, जनकल्याण फाउंडेशन व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुंद्यामाता नगर, कात्रज येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात मेमोग्राफी, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, डोळ्यांची तपासणी तसेच रक्तदान अशा विविध सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.

सुंद्यामाता नगर, सूर्योदय सोसायटी व बाबाजी नगर येथील 118 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. सर्व तपासणी अहवाल लाभार्थ्यांना देण्यात आले. तसेच आयोजित रक्तदान उपक्रमात 17 नागरिकांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.

शिबिरास परिसरातील महिलांपासून तरुण, लहान मुलांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी समर्थ युवा फाउंडेशनतर्फे मेडिकल व्हॅन व आवश्यक स्टाफची व्यवस्था करण्यात आली. रक्तसंकलनाची जबाबदारी सपकाळ सर यांच्या ‘मैत्र रक्ताची’ या पतपेढीने पार पाडली.

कार्यक्रमास जनकल्याण फाउंडेशनचे आदरणीय श्री. संतोष जाधव, राज नाईक, सुरेश सपकाळ,
स्पार्क सोशल एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष मुकुंद काळे व सोनाली काळे मॅडम सूर्योदय वृद्धाश्रमाच्या संस्थापिका छायाताई भगत, ‘एक क्षण आनंदाचे’ संस्थापक अक्षय भोईटे, झेप फाउंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड, सेवावृत्त फाउंडेशनचे प्रदीप देवकुळे, ब्रह्मांड संस्थेचे रेडकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

युवा समाजसेवक स्वराज भैय्या बाबर, समाजसेवक महेश दादा इंगवले व गीता ताई इंगवले यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक यशस्वी झाला.

स्पार्क सोशल एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी सुंद्यामाता नगर परिसरात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवते, तसेच वस्तीतील 1ली ते 9वीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, संगणक वर्ग, तर महिलांसाठी सक्षमीकरण व तांत्रिक कौशल्य विकास उपक्रम राबवते. समाजसेवा आणि आरोग्य जनजागृतीच्या दिशेने संस्थेचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *