रांजणगाव कारेगाव गटातील गावांना नवीन ट्रान्सफॉर्मर मंजुरी– मानसिंग पाचुंदकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश

Rahul
2 Min Read

रांजणगाव गणपती
प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार

रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांसाठी नवीन ट्रान्सफॉर्मरची महत्त्वपूर्ण मंजुरी मिळाली असून ग्रामीण भागातील विजेच्या ताणतणावाच्या समस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांसोबत मानसिंग पाचुंदकर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सदरील मंजुरी पुणे जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) मार्फत देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून विजेवरील वाढलेला भार, ग्रामीण भागातील औद्योगिक विस्तार, शेती पंपांची संख्या आणि वाढते गृहनिर्माण प्रकल्प यांच्या पार्श्वभूमीवर ही पायाभूत मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे

कुठे मिळणार नवीन ट्रान्सफॉर्मर?

मंजूर ट्रान्सफॉर्मर खालील ठिकाणी बसवण्यात येणार आहेत—

रांजणगाव अतिरिक्त संकल्प सिटी

रांजणगाव अतिरिक्त शेळके वस्ती
रांजणगाव अतिरिक्त खेडकर वस्ती
चिंचोली मोराची पाणीपुरवठा योजना
मोराची चिंचोली गणपतराव उकिरडे परिसर
वरुडे अतिरिक्त कालवा
वरुडे अतिरिक्त शिंदे समूह
वरुडे अतिरिक्त संतोष भरणे समूह
बुरुंजवाडी अतिरिक्त पांगारे मळा

“शेतकऱ्यांच्या विकासासाठी हा ऐतिहासिक टप्पा मनला जात असून रोज रोज उद्भवणारे विजेची समस्या काहीसे प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे

चौकट —

“रांजणगाव कारेगाव गटातील शेतकऱ्यांना दिवसा स्थिर वीजपुरवठा मिळावा, पाणीपुरवठा योजना सुरळीत चालाव्यात, आणि ग्रामीण भागातील औद्योगिक वाढीस गती मिळावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. ही मंजुरी म्हणजे कृषी आणि ग्रामीण विकासाला मिळालेला मोठा आधार आहे.”
विजेअभावी त्रस्त गावांना दिलासा
या प्रकल्पामुळे खालील लाभ अपेक्षित —
शेती पंपांना दिवसा पुरेसा वीजपुरवठा
नवीन वसाहती व प्रकल्पांना स्थिर वीजजाळे
पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढणार
वारंवार होणारा ट्रिपिंग आणि लो-व्होल्टेजचा त्रास कमी
स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले असून विविध गावांमध्ये विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

शिरूर आंबेगाव विधानसभा अध्यक्ष
मानसिंग पाचुंदकर

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *