कारंजा प्रतिनिधी सिद्धर्थ सोमकुवर
कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा येथे संत भाकरे महाराज विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक हेमराज चाके तर मुख्य पाहुणे म्हणून रूपचंद हिंगवे वरिष्ठ सहायक शिक्षक, अविनाश वऱ्हेकर, उमेश रेंघे, करडे बाबूजी, सुरेंद्र फुले पोलीस पाटील सुसुंद्रा, स्वप्निल खवशी सरपंच ग्रा. प. बेलगाव उपस्थित होते. रवींद्र वानखेडे, राजेश तायडे, सुनील मारोटकर, हरिविजय युवनाथे, राहुल फुले, सतीश भोने, अमित मारोडकर, सुचिता वरठी, विना इंगळे, वर्षा गायकवाड, अमर ढोक यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन किशोर ढोक यांनी तर आभार प्रदर्शन हिंगवे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.