ओंकार साखर ग्रूप – कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर

Rahul
1 Min Read

पुणे विवेकानंद फंड:-

      ओंकार साखर ग्रुपतर्फे आज एक महत्त्वपूर्ण व कर्मचारीहिताचा निर्णय घेतला आहे. समूहातील सर्व कर्मचार्‍यांना २० टक्के पगारवाढ लागू करण्यात येत असून याचा लाभ संपूर्ण ग्रुपमधील सर्व कर्मचारीवर्गाला मिळणार आहे.

ओंकार ग्रुपचे चेअरमन मा. श्री. बाबुराव बोत्रेपाटील यांनी सांगितले की,
“कर्मचारी हेच आमच्या समूहाची खरी ताकद आहेत. त्यांच्या परिश्रमामुळेच ओंकार ग्रुपने अल्पावधीत राज्यातील १८ साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करून उत्पादन क्षमतेत मोठी वाढ साध्य केली आहे. ही वेतनवाढ कर्मचारीवर्गाप्रती त्यांच्या परिश्रमाचे व त्यागाचे मोल आहे.”

समूहात सध्या १६,५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. समूहाच्या सर्व युनिटमध्ये वेळेवर वेतन, शेतकरी हिताचे उपक्रम, समाजकल्याण कार्यक्रम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यांसाठी ओंकार ग्रुप ओळखला जातो.

२०% पगारवाढ लागू झाल्यानंतर कर्मचार्‍यांच्या आर्थिक स्थैर्यात अधिक वाढ होणार असून आगामी गाळप हंगामासाठी यामुळे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *