सेलू. प्रशांत झाडे
येथील विकास चौक येथे अज्ञात भंगार चोर यांनी काल सकाळच्या सुमारास हात बंडी चोरी केल्याची घटना उघड झाली, आणि परिसरात एकच खळबळ उडाली कारण या परिसरात अनेक दुकानदार हात बंडी वर आपला व्यवसाय करून परिवाराचा प्रपंच चालवत आहे. पण सदर बंडी चोरी गेल्या मुळे इतर व्यावसायिक यांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे. मात्र भंगार चोर यांना कोणाचीही भीती नसल्याचे चित्र आहे.दुसरी कडे पेट्रोलिंग कर्मचारी यांच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सेलू शहरातील विकास चौकातून चहा व शिंगड्याची चार चाकी हातगाडी अज्ञात भंगार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच समोर आली.या प्रकरणी शोभा वसंत भानारक रा. बेलगाव यांनी सेलू पोलीस ठाण्यात ता.२७ गुरवराला सायंकाळी ५.३० वाजता तक्रार दाखल केली. सदर भंगार चोर पोलिसांच्या हाती लागेल की त्या तक्रार दारकाला नवीन हात गाडीचा भुर्दंड सोसावा लागेल हे काही दिवसात कळेल. मात्र भंगार चोरांची चार दिवस दिवाळी साजरी झाली हे निश्चीत.