कारंजा :
अवैध दारूची वाहतूक करताना कारंजा पोलिसांकडून दारूविक्रेत्याला अटक करण्यात आली आहे सागर राजेश डोंगरे रा. सारवाडी असं आरोपीच नाव आहे नागपूर अमरावती महामार्गावरील टोल नाका परिसरात नाकाबंदी दरम्यान दारुवाहतुक करताना आरोपीला अटक करण्यात आली आहे यामध्ये देशी दारुची अवैध वाहतुक करीत असल्याची माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर , गजानन मरस्कोल्हे, प्रशांत मरापे, दिनेश घसाड,अमोल मानमोडे यांनी टोलनाका येथे सायंकाळी 6 वाजता च्या सुमारास नाकेबंदी करुन आरोपीला ताब्यात घेतले यामध्ये आरोपीकडून देशी दारुच्या 90 मिली च्या 150 निप सह मोपेड क्र. MH-32-BA-3371 1,05,000/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी व पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे