( वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे )
वाई : शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष प्रतापराव भिलारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे,तालुका अध्यक्ष रवींद्र आप्पा भिलारे, युवा सेना योगेश फाळके तसेच शिवसेनेचे उमेदवार प्रवीण शिंदे यांनी वाई शहरातील विकासकामे, निधीउपयोग आणि आगामी निवडणूक धोरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली.विविध योजनांसाठी तब्बल ३२ कोटी १२ लाखांचा निधी
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार —
जिल्हा नियोजन फंडातून : २ कोटी १२ लाख रुपये,नगर विकास खात्याकडून घणकचरा
निर्मूलनासाठी : ५ कोटी रुपये
अशुद्ध पाणी शुद्धीकरणासाठी एसटीपी लाईन : २२ कोटी रुपये
किवरा ओढा बंधारा बांधकामासाठी : ३ कोटी रुपये असा महत्त्वाचा निधी वाई शहराच्या विकासासाठी मंजूर झाल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘स्वच्छ कार्ड लिस्ट’ हॉस्पिटल व शहर सुशोभीकरणाचे लक्ष्य असल्याचेही सांगितले.शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रवीण शिंदे म्हणाले,“वाई शहराच्या मध्यभागी १०० खाटांचे अद्यावत कार्डियोलॉजी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. भविष्यात घाटाचे सुशोभीकरण, स्वच्छ वायू आणि सुंदर वाई हा आमचा उद्देश असेल.”“शिवसेना ८०% समाजकारण व २०% राजकारण करते” – विकास शिंदे.उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांनी सांगितले की,“शिवसेनेने भाजपाशी युती करण्याचा प्रयत्न केला, परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेना सर्वसामान्य उमेदवाराला न्याय देते; जनतेने त्याला सेवा करण्याची संधी द्यावी.”
सत्ताधाऱ्यांवर आरोप — “विकासाचे गाजर दाखवले, पण प्रश्न प्रलंबितच”
“वाईसाठी कोट्यवधींचा निधी आणला, पण श्रेय उचलले गेले”पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वाईसाठी कोट्यवधींचा निधी आणला. परंतु सत्ताधाऱ्यांनी तो निधी स्वतःच्या नावावर खपवून जनतेची दिशाभूल केली.”
वाई शहरातील प्रमुख प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन.शिवसेनेने पुढील प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची भूमिका मांडली —पार्किंगची समस्या,वाहतुकीची कोंडी भाजीमंडईचा रखडलेला प्रश्न,शहरातील मूलभूत सुविधा
,सुशोभीकरण व आरोग्य सेवा
“वाईकरांनी योग्य तो निर्णय घेऊन निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जागा दाखवावी” असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.