*एकाच परिवारातील एकाचा मृत्यू तर तीघे गंभीर जखमी*
*जखमींना अमरावती येथील सामान्य रुग्णालयात केले दाखल*
लहान आर्वी :-**प्रतिनिधी/सुनिल साबळे*
आष्टी शहरातील पाटील परीवार खाजगी चार चाकी वाहन भाड्याने करून अमरावती येथे असलेल्या सावरकर परीवारातील लग्नाला गेले होते.लग्न आटोपून आष्टीला परत येत असताना आष्टी नजीक चांद सूर्याच्या पहाडा नजीक तळेगाव – आष्टी रोडवर ट्रॅक्टरला लागून असलेल्या टँकरवर फोर व्हीलर धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीघे गंभीर जखमी झाले
सविस्तर वृत्त असे की ,आष्टी येथील रहिवासी मृतक दिलीप भीमराव पाटील( वय ६३वर्ष )व मृतकाची पत्नी सौ. रागिणी दिलीप पाटील (वय ६० वर्ष) , भाऊ विजय भीमराव पाटील (वय ५२वर्ष), सौ संगीता विजय पाटील (वय ५०वर्ष)हे सर्वजण अमरावतीला सावरकर यांच्या लग्नात भाड्याने गाडी करून गेले होते.लग्न आटोपुन आष्टी येथे परत आले असताना तळेगाव-आष्टी रोडवर आष्टी नजीक चांद सूर्याच्या पहाडा जवळ रोडवर ट्रॅक्टर सह टँकर लागून असलेल्या उभ्या टँकरला होंडा कंपनीच्या फोर व्हीलर गाडी नंबर एम.पी.०९ सी. , सी. आर.४७२२या गाडीने मागून टँकरला धडक बसल्याने गाडी चालक दस्तगीर इब्राहिम खान (वय ५२ वर्ष) आणि दिलीप भीमराव पाटील (वय ६३वर्ष )माळीपुरा ,आष्टी यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तसेच गंभीर जखमी सौ रागिनी दिलीप पाटील (वय ६०वर्ष), विजय भीमराव पाटील (वय ५५वर्ष),आणि सौ संगीता विजय पाटील (वय ५० वर्ष) हे तिघेही गंभीर जखमी झाल्याने यांना अमरावती येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे करीत आहे.
