*देवातारे लेआऊट मध्ये चोरी चे सत्र सुरूच*
सेलू. प्रशांत झाडे
येथील तथागत कॉम्प्लेक्स समोर ठेवून असलेली हात बंडी ची चोरी ताजीच असताना आता पिण्याच्या पाण्याचा तांब्याचा हंडा चोरून नेल्याची घटना घडली. कोतीवाडा येथे सुद्धा हंडा चोरी गेल्याची माहिती आहे.
थंडी जस जशी जोर काढत आहे त्याच प्रमाणे हे भंगार चोर सुद्धा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मात्र हात बंडी चोरीतील भंगार चोर मोकाट असतानाच आता चोरट्यांनी हंडा चोरी कडे मोर्चा वळविला आहे. शहरात चोरीच्या घटना घडत असताना पोलीस यंत्रणा मात्र काय करीत आहे हा संशोधनाचा विषय आहे. प्राप्त माहिती नुसार दुर्गा अनिल बडवाइक रा. देवतारे लेआऊट यांनी दिनांक 20 डिसेंबर ला वेळ अकरा वाजता तांब्याचा हंडा चोरी झाल्याची तक्रार सेलू पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रार दाखल होताच पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी यांनी मोक्का पाहणी सुद्धा केली. परंतु हात बंडी चोरीतील आरोपी अद्याप येथील कर्मचारी यांना गवसले नसून हंडा चोरीतील आरोपी गवसणार का? हे पाहणे अवचीत्याचे ठरेल. हात बंडी चोरीतील आरोपी आणि हंडा चोरीतील आरोपी हे एकच असावे अशी कुजबूज येथील नागरिकांन मध्ये जोर धरत आहे.