- आष्टी (शहीद ):– तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 15/11/2025 रोज शनिवारला कैलासवासी गोपाळराव वाघ केंद्र शाळा आष्टी येथे जनजाती गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर हा पंधरवाडा जनजाती गौरव पंधरवडा म्हणून शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला. हा पंधरवडा साजरा करताना विद्यार्थ्यांकडून अनेक उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या पंधरवड्यामध्ये विद्यार्थ्यांनी वारली चित्रकला, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा , आदिवासी समाजाची वेशभूषा अशा अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला.
आज या पंधरवाड्याची सांगता जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीने करण्यात आली. आजच्या या जनजाती गौरव दिनाच्या निमित्य जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन आष्टी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री गजानन पुरी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संध्या ठाकरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी अप्रतिम गोंडी नृत्य सादर केले.या कार्यक्रमाचे संचालन श्री सचिन नागपुरे यांनी केले,तर प्रास्ताविक सौ संध्या ठाकरे यांनी केले.जननायक बिरसा मुंडा यांच्या ब्रिटिश राजवटी विरोधातील उलगुलान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन श्री गजानन पुरी सर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्नेहा नीचत मॅडम यांनी केले.कार्यक्रमाची सांगता मुलांना खाऊ वाटप करून करण्यात आली.