रांजणगाव गणपती येथे आराध्या वेलनेस अँड फिटनेस सेंटरचे भव्य उद्घाटन

Rahul
2 Min Read

 

शिरूर:- पुणे प्रतिनिधी (शकील मनियार)

रांजणगाव गणपती येथे आरोग्यदायी समाजनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि भव्य पाऊल उचलत आराध्या वेलनेस अँड फिटनेस सेंटर (आरोग्य मंदिर शाखा) चे उद्घाटन रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता अतिशय दिमाखात व उत्साहात पार पडले. उपस्थित मान्यवरांची उपस्थिती, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आरोग्यसेवेची नवी उर्जा यामुळे सोहळ्याचे स्वरूप अधिकच विराट झाले.

या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ
स्वातीताई पाचुंदकर
(जिल्हा परिषद सदस्य, पुणे व अध्यक्ष – श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट)
यांच्या शुभहस्ते करण्यात आला. रिबन कटिंगसोबतच वेलनेस सेंटरच्या संकल्पनेचे, उपलब्ध सुविधा व भावी आरोग्य उपक्रमांचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी दिले.

उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रातील योगदान, आधुनिक फिटनेस संकल्पना आणि समाजातील आरोग्यजागृतीचा आवश्यक संदेश देत सोहळ्याची शोभा अनेक पटीने वाढवली. यावेळी डॉ. अर्जुन सुसे सर वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार अश्फाक सय्यद सर वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार

स्वाती / विकास पवार सर – वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार यांची उपस्थिती प्रार्थनीय होते कार्यक्रमाचे नियोजन. ज्योती / सचिन धारकर सर – आरोग्य सल्लागार तसेच मीना / राम मुंढे सर – आरोग्य सल्लागार यांनी केले होते या वेलनेस सेंटरमध्ये योग, फिटनेस ट्रेनिंग, ध्यान, आहार व जीवनशैली मार्गदर्शन, मानसिक तंदुरुस्तीचे सत्र यांसारख्या अत्याधुनिक आणि आरोग्यवर्धक सुविधा उपलब्ध होणार आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल साधण्यासाठी हे केंद्र रांजणगाव परिसरातील नागरिकांसाठी एक वरदान ठरणार आहे.

मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रातील संघभावनेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की— एक तंदुरुस्त आणि निरोगी समाज घडविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून अशा केंद्रांची गरज समाजाला नवचैतन्य देणारी आहे.

उद्घाटन सोहळ्यास नागरिक, महिला-पुरुष, तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरात आरोग्याच्या नवचैतन्याचा, सकारात्मक ऊर्जेचा आणि एकतेच्या भावना जागृत करणारा अविस्मरणीय माहोल पाहायला मिळाला.

रांजणगावात हे अत्याधुनिक वेलनेस सेंटर सुरू झाल्यामुळे फिटनेस संस्कृतीला नवी दिशा मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आरोग्यविषयक बदल घडविण्यास साहाय्य होणार आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *