*कारंजा प्रतिनिधी सिद्धार्थ सोमकुवर*
कारंजा तालुक्यातील हेटीगुंडी तयेथे रात्रीला साडेनऊ वाजता अस्वलाचा अचानक शिरकाव झाल्याने गावात खळबळ उडाली. सोबतच नागरिकांना अस्वल दिसल्याने नागरिक जमा झाले. त्यानंतर अचानक भीतीने अचानक गावकऱ्यांनी हल्ला चढवला. त्या हल्ल्यात गावातील त ओमशक्ती साठे यांच्याकडे राहणारे गुराखी, ज्ञानेश्वर हिंगवे व सौ चंद्रकला वाघमारे यांच्यावर हल्ला चढवीत अस्वलाने त्यांना जखमी केले. सदर घटनेची माहिती वनक्षेत्र परिक्षेत्र अधिकारी यांना कळविण्यात आली. तसेच जखमींना तात्काळ उपचार करिता ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे हलविण्यात आले. सोबतच वनविभागाची गाडी सुद्धा गावात आली. त्यांनी अश्वलांचा शोधा शोध सुरू केला.त्यांना अस्वलाचे पायाचे ठसे आढळले, परंतु अस्वल दिसली नाही. जवळपास दोन तास अश्वलीची शोध मोहीम सुरू होती. सोबतच फटाक्याचा आवाज करीत गावातून तिला पळवण्याचा प्रयत्न केला, या सदर घटनेमुळे गावात भीतीचे वातावर निर्माण झाले. या वन्य हिंस्र प्राण्यांपासून गावकऱ्यांना संरक्षण मिळावे अशी मागणी गावकरी करत आहे. सोबतच वारंवार अस्वलाचा या परिसरात वाघाचा सुद्धा शिरका होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. सदर भीतीपासून आम्हाला संरक्षण करावे अशी माहिती अशी विनंती गावकरी प्रशासनाला करीत आहे. 