साहूर :-
जय संत या भूतलावर जन्माला आलेत त्यांनी अज्ञानी जीवाला ज्ञानाच्या प्रकाश वाटा दाखविण्याचे काम केले. आज तरुणाईला संतांच्या विचाराशिवाय पर्याय उरलेला नाही. संतांच्या साहित्यातच जगाचा उद्धार आहे कारण अज्ञानी जीवांच्या उद्धारासाठी संतांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजविला असे विचार ग्रामगीताचार्य ह.भ.प.श्री.गजानन महाराज भोरे यांनी गोपालकाल्याच्या कीर्तनातून व्यक्त केले.
बोरगाव( टू.) येथे येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव व कैवल्य साम्राज्यवर्ती श्री संत ज्ञानोबारायांचा संजीवनी समाधी सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या तीन दिवसीय महोत्सवात ग्रामसफाई, प्रभाती सामुदायिक ध्यान, रामधून, सामुदायिक प्रार्थना, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १५ ला श्री अमोल ढोले व सौ लावण्या अमोल ढोले यांचे हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली. त्यानंतर दिनांक १६ ला रात्री ग्रामगीताचार्य हरिभक्त परायण श्री गजानन महाराज भोरे यांचे कीर्तन व दिनांक 1७ ला प्रभाती सामुदायिक ध्यान व रामधून नंतर ११ वाजता श्री भोरे महाराज यांचे गोपाल काल्यावर कीर्तन झाले. ज्यावेळी गुरुदेव प्रचारक प्रा. रेवा शंकर वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ शैलाताई वाघ, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवा अधिकारी तारेश बोडखे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मोहनभाऊ राठी, बापूरावजी शिलसकार, गुणवंतराव घोंगडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमातील गावातील आबाल वृद्धांसह वयोवृद्ध महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी समायोजित मार्गदर्शन केले. यावेळी हार्मोनियम वादक जगदीश महाराज शेळके, मृदंग वादक अरुण महाराज ठोंबरे, गायक संजय महाराज काळे, श्री राऊत महाराज, ओम शेंद्रे, वाघ, पुंडलिकराव गुल्हाने आदींनी साथ संगती केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करता श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.