दुचाकी स्वारावर अस्वलीचा हल्ला दोन गंभीर 

Rahul
2 Min Read

 

आष्टी ते थार मार्गांवर घडली घटना 

आष्टी शहीद :-=प्रतिनिधी

आष्टी ते थार मार्गांवर आडनाला परिसरात एका झुडूपात दगा धरून बसलेल्या दोन अस्वली ने दुचाकी वर स्वार दोघांवर जीव घेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना दि. 26रोजी दुपारी 2.30वाजता घडली. जखमी दोघांनी मोठयाने आवाज करून अस्वली सोबत तास भर झुंज दिल्यावर अस्वल पळून गेली. मागावरून येणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांनी दोन्हीही जखमी आत मध्ये घेऊन आष्टी ग्रामीण रुग्णालय येथें उपचारासाठी दाखल केले.

सविस्तर असे की,

आष्टी येथील रहिवाशी सदाशिव शेळकी वं त्यांचा मुलगा सागर शेळकी रा. इंदिरा नगर आष्टी येथील असून हे दोघेही बाप लेक मैस विकत घेण्यासाठी थार या गावात गेले होते. परत येते वेळी थार येथून दुचाकी वर स्वार होऊन आष्टी च्या दिशेने जाण्यासाठी निघाले तेव्हा आड नाला हॅन्ड पंप परिसरात एका झुदुपात दगा धरून बसलेल्या अस्वळीने दुचाकी झेप घेतली आणि जोरदार हल्ला करायला सुरवात केली या हल्ल्यात शेळकी परिवाराच्या बाप लेकानी एक तास भर झुंज दिली आणि शेवटी अस्वल पळून गेली पण बाप लेक हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. काही वेळात मागहून कापूस खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे चारचाकी वाहन आले. या व्यापाऱ्यांनी माणुसकी म्हणून जखमी ना वाहणात बसून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथें भरती केले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली तेव्हा वनपाल विकास चौधरी, बिट गार्ड राम गायकवाड हे दोन कर्मचारी घटना स्तळी दाखल झाले आजू बाजू ची पाहणी करून पंचनामा केला. जखमी सदाशिव शेळकी वय 50वं सागर शेळकी वय 28यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथें नेण्यात आले. आष्टी ते थार मार्गांवर वन्य प्राणी दिवस रात्र दिसततात ही सवय नागरिकांना होती मात्र आता वन्य प्राणी हल्ले कररायला लागले आहेत. वनविभागाने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *