कारंजा:-प्रतिनिधी
*”रुग्नसेवा हिच ईश्वर सेवा”* ही भावना मनाशी बाळगून कारंजा तालुक्यात सर्वपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते बाबाराव सोमकुवर यांनी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित व
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे)
यांच्या संयुक्त विद्यमाने आर्वी विधानसभा क्षेत्राचे युवा तडफदार जनतेच्या मनात राज करणारे आमदार सुमितदादा वानखेडे यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य आरोग्य रोग निदान व रक्तदान शिबीर दि. १४ नोव्हेंबर २०२५ वेळ सकाळी १० ते दु. ५ पर्यंत कारंजा तालुक्यात प्रसिद्ध असलेली जगदंबा माता मंदिर, परिसर ठाणेगांव ता. कारंजा (घा.) जि. वर्धा येथे यशस्वीरित्या पार पडले.या शिबिरात 350 पेक्षा अधिक पुढील आजाराची तपासणी व उपचार करण्यात आले.
*वैद्यकीय सेवा वैद्यकीय टीम*
डॉ प्रित अग्रवाल (मेडिसीन कक्ष) यांच्या मार्गदर्शनात रसदाय, ब्लडशुगर, बरेच दिवसाचा ताप. किडणीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे इत्यादी रोगांवर निदान व उपचार करण्यात आले.डॉ कुणाल भट (नेत्ररोग तज्ञ) यांच्या मार्गदर्शनात डोळयांचे सर्व आजार मोतियाविशत्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी तपासणी करण्यात आले.
डॉ आदर्श जयसूर्या (सर्जरी तज्ञ , अस्थिरोग तज्ञ) संधिवात, मणक्यात अराबारी गंप वाकलेले पाय फ्रेक्चर तसेच हाडांचे सर्व आजारहायड्रोसित, हर्निया अंगावरील गाठी. आतक्याचे आजार, मुतन्त्रक्ष्याचे आजार, पोडाचे आजार, गलगंड (थायरॉईड) इत्यादी तपासणी करण्यात आली.
डॉ विधी जैन (स्त्रीरोग तज्ञ) मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे महिलांचे आजार इत्यादी संबंधित तपासणी करण्यात आली.
डॉ समृद्धी म्याडम (बालरोग तज्ञ) हृदयाला छिद्र असणे, मतिमंद मुलांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजारांची यावेळी तपासणी करण्यात आली.तसेच रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन यावेळी करण्यात आले होते वर्धा येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या ब्लड सेंटरच्या चमूने ही रक्तदान शिबिर याची सर्व प्रक्रिया पार पाडली, यावेळेस तालुक्यातील 16 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हेच जीवनदान म्हणत रक्तदान केले.
*समारोपय कार्यक्रमाची सुरुवात माता जगदंबा यांना वंदन करून करण्यात आली.*
या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमितदादा वानखडे हे होते. आरोग्य शिबिराचे उद्घाटक म्हणून सौ सरिताताई गाखरे (जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा वर्धा जिल्हा महामंत्री भाजपा) यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून
श्री कमलाकरजी निंबोरकर(महामंत्री भाजपा वर्धा जिल्हा) यांची उपस्थिती होती. तसेच विचारमंचकावर मा.जि. परिषद सदस्य श्री सुरेशभाऊ खवशी, पंचायत समिती माजी उपसभापती श्री जगदीशभाऊ डोळे, माजी पंचायत समिती सदस्य सौ पुष्पाताई जीवनजी चरडे, तालुका अध्यक्ष भाजपा श्री. चक्रधरजी डोंगरे ,शहर अध्यक्ष कारंजा श्री दिलीपभाऊ जसूतकर , सामाजिक कार्यकर्ता श्री बाबाराव सोमकुवर, सौ वनिताताई सोमकुवर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा, .हरिभाऊ धोटे , श्री वासुदेवराव कामडी ठाणेगाव, श्री राधेशाम कुमेरीया जऊरवाडा, श्री दिलीपराव हिंगणीकर सरपंच तरोडा,श्री दिनेशजी चौधरी सरपंच बोरी, श्री कपिलभाऊ खवशी नारा, सुसुंद्रा येथील कार्यकर्ते भरत कोरडे, वसंता फुले अमित मारोटकर, बिहाडी येथील पवन बोडखे, इत्यादी मान्यवर विचार मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक भांगे यांनी केले. तर आपल्या मनोगत पर भाषणात सामाजिक कार्यकर्ते श्री बाबाराव सोमकुवर म्हणाले की माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा विचार माननीय आमदार सुमितभाऊ वानखडे यांचा असून तोच विचार मनाशी बाळगून मी या आरोग्य शिबिराचे आयोजन केलं असे मत यावेळेस त्यांनी प्रतिपादन केलं. यावेळी अध्यक्ष भाषणात आमदार सुमितदादा वानखडे म्हणाले की या शिबिरातील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जाणवतं की या आरोग्य शिबिराचा लाभ त्यांनी घेतला असावा, त्याचप्रमाणे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असून कारंजा तालुक्यातील रुग्णांची सेवा करण्यास मी कटिबद्ध आहे. यावेळी अशे उद्गार त्यांनी अध्यक्ष भाषणात काढले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता , ठाणेगाव , सेलगाव, बिहाडी,नारा,तरोडा , काकडा परसोडी , सुसुंद्रा, वाघोडा, बेलगाव,सावरडोह, खापरी, बोरी,गोंधणी ,जऊरवाडा ,आजनादेवी व खैरी या गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.