गट विकास अधिकाऱ्यांनी घेतला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आढावा

Rahul
1 Min Read

 

समुद्रपूर – तालुक्यातील मांडगाव ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना संधर्भात सर्कल आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला मा. गटविकास अधिकारी सतीश टिचकुले, विस्तार अधिकारी श्री गणेश माने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मा गटविकास अधिकारी सतीश टिचकुले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून अभियानाच्या प्रत्येक बाबीचा सखोल आढावा घेऊन मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसंमृद्ध हरित गाव, मनरेगा व इतर योजनाशी अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमिकरण, उपजीविका व सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान नाविन्यपूर्ण उपक्रम यासंदर्भात विस्तार अधिकारी गणेश माने यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला मांडगावचे ग्रामविकास अधिकारी दिनेश थुल, देरडा ग्रामपंचायत अधिकारी विवेक मुनेश्वर,ग्रामसेक कळमकर ग्रामसेवक पानबुडे ग्रामसेवक उताणे ग्रामसेवक फुलझेले ग्रामसेवक येरकुडे ग्रामसेवक उताणे मॅडम ग्रामसेवक मुंजेवार मॅडम व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी यांचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत लिपीक उमेश विहीरकर यांनी केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *