समुद्रपूर
संस्कार ज्ञानपीठ शाळा समुद्रपुर येथे संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता बौद्धिक आणि पुस्तकी ज्ञानासोबतच कला कौशल्याची सुद्धा गरज आहे त्यामुळे वास्तविक जीवनात वावरताना त्याला आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा आणि कला कौशल्याचा उपयोग होईल. त्यासाठीच शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविल्या जातात यापैकीच संगीत हा महत्त्वाचा उपक्रम आहे याच अनुसंघाने संस्कार ज्ञानपीठ शाळेच्या संगीत विभागातर्फे दिनांक 22 नोव्हेंबर 2025 ला संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यात वर्धा येथील संगीत शिक्षिका खुशबू कठाने यांनी आपल्या सुमधुर शैलित विद्यार्थ्यांना राग आणि संगीत कलेचे धडे दिलेत आरोह , अवरोह,अलंकार ,तान ,चाल , लय ,सूर ,आवाजाचा चढ-उतार याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले त्याचबरोबर त्यांनी अभंग सिने गीत गझल भावगीते सुद्धा सादर केली त्यांना हार्मोनियम वर अक्षय कोल्हे यांनी सात दिली कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य विजय राऊत व अध्यक्ष आकाश जयस्वाल उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षक कृष्णा धुळे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल सुरेंद्र रंगारी यांनी मानले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संगीत विभागाचे वृषभ लोणबळे जीवन वाघ मंगेश उपरे सुरेंद्र रंगारी अमोल डोंगरे आणि मनोज भोयरयांनी काम पाहिले.
संस्कार ज्ञानपीठ शाळेत संगीत कार्यशाळा संपन्न
Leave a Comment