
दिंडीचे त्रिरत्न बुद्ध विहारात सुप्रीया महिला मंडळाकडून उस्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळेस सामाजीक एकोप्याची एकजूट असल्याचे दिसून आले. इतर गावातील लोकांसमोर गौळवासीयांचा आदर्श राहीला आहे. येथे सर्वधर्मीय लोक राहत असून आनंदात सर्व धर्मीय उत्सव साजरे केले जातात. यामध्ये दुर्गात्सव, गणपती, बिरसामुंडा जयंती, अन्नाभाऊ साठे जयंती, शिवजयंती, तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकरी जयती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळेस गावातील सर्व धर्मीय लोक एकमेकाना शुभेच्छा देऊन प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी होतात. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय व सर्व स्तरातील गावातील नागरीक संत लोटांगण महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होतात. झालेल्या चातुर्मास समाप्ती महोत्सव उत्सवात भव्य पत्ताका दिंड्या तथा अश्वे दिंडीत सहभागी झालेत. संत लोटांगण महाराज समाधी स्थळी दहीहंडी फोडून गावातून दिंडी, पालखीची मिरवणूक त्रिरत्न बुद्ध विहाराजवळ आली असता सुप्रीय महिला मंडळ तथा बौद्ध उपासकाच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले.
यावेळेस ञिवेनी वाघमारे,वनमाला मुन,मनीषा मुन आशा कांबळे आशा मोडक,जनुबाई मुन विमल कांबळे ,दुशंता काबंळे,माला वाघमारे,माजी सरपंच मारोतराव लोहवे,विवेक मुन,हरिश गोटे,विजय जारुंडे,सुमेध सेलकर,ताराचंद मुरारकर,बुलाकीदास मोडक,गजानन मोडक,संस्थानाचे अध्यक्ष रामदास पवार,उपाध्यक्ष नरेश घोंगे,माजी सरपंच मिलिंद खोडके , समीर सारजे अमोल कसनारे,निलेश कसनारे,दिलीप भोंग, गंगाधर भोंग,खटेश्वर राऊत, मनोज नागपुरे,किरण खोडके यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. दुपारी जुनोना येथील नामदेव महाराज वसु यांचे काल्याचे किर्तन होऊन श्री संत लोटांगण महाराज यांच्या प्रतिमेची गावातुन भव्य मिरवणूक निघून संत लोटांगण महाराज यांच्या समाधी स्थळी दुपारी दिड वाजता दही हंडी फोडण्यात आली.महाप्रसादाने कार्यक्रमाची सागंता करण्यात आली.