“तायवाडे महाविद्यालय, महादुला – कोराडी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद”

Rahul
2 Min Read

कोराडी दिलीप येवले:-
तायवाडे महाविद्यालय, महादुला – कोरडी येथे ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा कॅरिअर कट्टा , तायवाडे महाविद्यालय आणि फिनिक्स अकॅडमी, कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.
या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे फिनिक्स करिअर अकॅडमी, कोराडीचे संचालक श्री. प्रदीप कमाले तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री. सतीश शिंदे हे होते. कार्यशाळेचे अध्यक्षपद तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयु तायवाडे यांनी भूषविले.
तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती, अभ्यासाची पद्धत व नियोजन, प्रश्न सोडविण्याच्या सोप्या पद्धती तसेच वेळ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः श्री. सतीश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची कशी प्रभावीपणे तयारी करावी याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक सोप्या आणि उपयुक्त युक्त्या शिकवून अवघड प्रश्नही सोप्या पद्धतीने सोडवता येतात हे दाखवून दिले.
या कार्यशाळेचे संयोजक डॉ. योगेश थेरे तर सहसंयोजक डॉ. शरद डवरे होते. आयक्यूएसी समन्वयक डॉ. गिरीश काटकर तसेच क्रायटेरिया ८ प्रमुख डॉ. वर्षा वैद्य यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रेरणादायी वातावरण यामुळे ही कार्यशाळा विशेष यशस्वी ठरली. संपूर्ण तीन दिवस विद्यार्थ्यांना ज्ञान, प्रेरणा आणि योग्य दिशादर्शन मिळाले असून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे विद्यार्थी व शिक्षकांकडून सांगण्यात आले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *