कारंजा:- शहरातील वार्ड क्र.8 येथील खुल्या प्रांगणावर नमो उद्यान करणेबाबत नागरिकांची एकजूट झाली आहे कारंजा शहरातील वार्ड क्र. ८,१० व १२ मधील नागरिकांनी नगरपंचायत ला निवेदन देऊन मागणी केली आहे राज्य शासनाने शहरी भागात प्रत्येक जागेवर खुल्या प्रांगणावर “नमो उद्यान” निर्माण करण्यास मंजुरी प्रदान केलेली आहे त्या अनुषंगाने कारंजा शहरात नागरिकांना फिरण्या करिता मोठे उद्यान नाही तसेच इतर कोणते खुले प्रांगण नाही किंवा कोणतेही पार्क नाही त्यामुळे नागरिकांना हाईवे लागत सर्विस रोडवर फिरत असल्या कारणाने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने मंजूर केलेले उद्यान कारंजा शहरतील नागरिकांच्या उत्तम सुविधे युक्त तयार करण्या करिता प्रभाग क्र.येथील खासगी शाळे समोरील मोकळी जागा अतिशय सोईची व नागरिकांच्या हिताची असल्याचे नागरिकांचे मत आहे तसेच सदर जागा ही शहराच्या मध्य भाग येत असून शहरात प्रत्येक नागरिकाला उद्यान मध्ये फिरण्या करिता व व्यायाम व लहान मुलांना खेळण्यासाठी उत्तम उद्यान करता येणे सोईचे होईल त्यामुळे नगर पंचायत मालकीची असलेली प्रभाक क्रमांक ८ खासगी शाळे समोरील मोकळी जागा ही नमो उद्यान करिता निश्चित करावी नागरिकांनी अशी विनंती नगरपंचायत ला केली आहे या मोकळ्या जागेवर नमो उद्यान न झाल्यास अन्यथा कारंजा वासियान तर्फे उग्र आंदोलन, आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे