बुद्रुक येथील हळपट्टी शिवारात मागील पंधरा दिवसापासून पिंजऱ्याला चकवा देत असलेला बिबट्याला अखेर वनविभाग व प्राणी मित्राच्या संयुक्त प्रयत्नातून बिबट्यास जेरबंद करण्यात यश आले जनसेवा कार्यालया जवळील सौ माधुरी सुनील वाबळे यांच्या गट, नं 472 मधील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात साधारण 14 वर्ष वर्षाचा नरबिट्या पहाटेच्या सुमारास अडकला गेल्या काही महिन्यापासून दोनच बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने परिसरातील कुत्री शेळ्या कालवडी यांच्यावरती बिबट्याचे सतत हल्ले चालूच आहे वाढत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अक्षय वाबळे व राम कोते यांनी पिंजऱ्याची मागणी केली होती त्यानंतर वन विभागाने तातडीने पिंजरा उपलब्ध करून दिला सुरुवातीला भक्ष म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या, मात्र बिबट्या आकर्षित न झाल्याने नंतर शेळी ठेवण्यात आली तरीही बिबट्या पिंजऱ्यात अडकला नव्हता अखेर काल संध्याकाळी कुत्र्याचे पिल्लू भक्ष म्हणून ठेवण्यात आले आणि पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्याचा दरवाजा आपटण्याचा आवाज आला त्यानंतर ग्रामस्थ सुनील वाबळे अभिनय कोते शिंदे व बर्डे यांनी प्रत्यक्ष जाऊन बिबट्या स जेरबंद झाल्याची खात्री केली व तात्काळ प्राणी मित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.