आमदार विकास निधीतून बांधलेले बस स्टॉप बनले ढोसणाऱ्यांचे आश्रयस्थान

Rahul
2 Min Read

*सेलूतील विकास चौकातील बस स्टॉप बनले शोभेची वस्तू*

*मुत्रीघर अभावी निकामी ठरत आहे.

*बस स्थानक च्या भिंतीचा उपयोग मात्र पोस्टर लावण्याकारिता.

 

सेलू. प्रशांत झाडे 

मागील सात आठ वर्षापूर्वी स्थानिक विकास चौकात आमदार निधीतून टोलेजंग बसस्थानक बांधल्या गेले.परंतु ते प्रवाश्यांना कमी उपयोगासाठी येत असून थकल्या भागल्याना कमी व दारु ढोकसनार्यांना जास्त फायद्याचे आश्रयस्थळ ठरत आहे.राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते नेत्यांना आपल्या वाढदिवसाची,निवडणुकीची जाहिरातीचे पोस्टर लावण्यासाठी जास्त उपयोगी पडत असल्याचे दिसून येत आहे.परंतु बाजूला रिकामी जागा असून ही मुत्री घराची व्यवस्था नसल्याने हे निकामी ठरत असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणने आहे.

. या विकास चौकातून ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्या राज्य परिवहनच्या अनेक बसेस जातात.सदर परिसरात अनेक आरोग्यरुग्णालय,, अभिलेख कार्यालय,तहसील,पंचायत समिती, कृषी शासकीय कार्यालय आहेत कर्मचाऱ्यांसाठी व ग्रामीण भागातील जनतेला ये-करण्यासाठी हेच प्रमुख व सोयीचे ठिकाण आहे .पण या बयस्टॉपवर थांबण्यासाठी बस चालक वाहक कुचंबना करतात व इथे शौचालय व मुत्रीघर नसल्याने विशेषतः महिलांची अत्यंत गैरसोय होत आहे ही शोकांतिका आहे.

      महिला,शाळकरी,उच्च शिक्षण घेण्यासाठी वर्धा,नागपूर ये-जा करणाऱ्या व ग्रामीण भागातील मुला-मुलींची,कर्मचारी महिलांची बरीच संख्या दिसून येते.परंतू लघूशंका जाण्यासाठी मूत्री घराची दूरपर्यंत कोणतीच व्यवस्था नसल्याने त्यांना चांगलेच मनस्ताप सहन करावे लागते, एफ. सी. आय. गोडाऊन समोर तात्पुरते मूत्रिघरची नगरपंचायत प्रसासनने व्यवस्था केली होती पण सध्या लोटागंण घेऊन आहे.याबतीत प्रभाग क्र.६ च्या नगरसेविका सौ.गीता रामगडिया यांचे कडून याबतीत संबधित प्रसासन कडे लक्ष वेधण्यासाठी बरेचदा प्रयत्न करुनही त्याकडे दूर्लक्ष केल्या जात असल्याचे त्यांंनी बोलताना सांगितले.

          विकास चौकातून नागपूर, वर्धा तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात आवागमन करणारे मोठ्या संख्येने प्रवासी दिसून येतात. त्यांना झाडाचा आडोसा घैवून बसेसची प्रतिक्षा करावी लागते.कारण तेथील बसस्टापवर एकतर कमी प्रमाणात बस थांबतात व त्यातही बस स्टाप सामोर अनेक हातगाडीवाल्यांनी व्यवसाय थाटले आहेत.त्याच्या बाजूलाच मोकळी जागा आहे. परंतु मूत्रीघरची व्यवस्था नसल्याने मिनी बसस्थानक शोभेची वस्तू बनली आहे.याकडे लोकप्रतिनिधीं व प्रसासनाने आवर्जून लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *