एक दिवसाआड पाणीपुरवठा व कचरा संकलन बंदच्या विरोधात आष्टी नगरपंचायत वर भाजपचा मोर्चा

Rahul
2 Min Read

आष्टी (शहीद):-

   एक दिवसा आड पाणी पुरवठा व कचरा संकलन बंद च्या विरोधात शहर भाजपच्या वतीने शहरवासीयांना घेऊन आष्टी नगरपंचायत वर मोर्चा आज मोर्चा काढण्यात आला.

  आष्टी शहरात तीन आठवड्यापासून कचरा संकलन बंद असल्याने व मागील तीन महिन्यापासून शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाच्या आड होत असल्याने गेल्या काही दिवसापासून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विरोधात आज दि. 20 ला नागरिकांना घेऊन आष्टी शहरात भाजपने मोर्चा काढला. या मोर्चात शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले. आष्टी नगरपंचायतचा सत्ताधारी पक्ष नागरिकाच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरल्याने भाजप नेत्यांनी नगरपंचायत बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच पाणी पुरवठा एक दिवसाच्या आड होत असल्याने पाणी पट्टी कर 50 टक्के कमी करण्यात यावा अशी मागणी केली.

येत्या काही दिवसांत या समस्येवर तोडगा न निघाल्यास यानंतर तीव्र आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. मोर्चात भाजप कार्यकर्ते सह असंख्य तनागरिक सहभागी झाले होते. 

 बाजार पेठेतून मोर्चा मुख्य मार्गाने नगरपंचात कार्यालय समोर गेल्या नंतर भाजपाचे गटनेते व नगरसेवक ॲड मनिष ठोंबरे भाजप नेते अशोक विजयकर यांनी मोर्चाला संबोधित केले. गट नेते मनिष ठोंबरे यांनी सत्ताधाऱ्यांचे भोंगळ कारभाराचे वाभाडे काढत शहरवासीयांच्या गैरसोयीला सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याने सत्ताधाऱ्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येची जाणीव असतानाही नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष यात कमी पडल्याची टीका अशोक विजयकर यांनी केली. 

   मोर्चात भाजप गटनेते ॲड मनिष ठोंबरे भाजपा पदाधिकारी अशोक विजयकर, नरेंद भनेरकर उत्तम बरगे अजय लेकुरवाडे सुधाकर निचत विलास चोहटकर सुरेश काळबांडे विलास नागपुरे सचिन गुप्ता सचिन पाचघरे अतुल गुल्हाने अनिल इखार नीरज भार्गव अमर टेकाम सागर सिनकर आवाज खान अक्षय राजुरकर चंदू मदनकर जाकीर अली सुधाकर सावरकर, सुभाष निंबेकर निलेश सरोदे मोहन वर्गने अविनाश कदम सतीश बिजवे राजेश जांभूळकर राम सुरजुसे सचिन नासरे मंगेश शिरभाते नरेश दारोकर बाबाराव इखार गजानन आडे सुभाष पोकळे अक्षय इखार रामेश्वर गुल्हाने आकाश शेळके यांच्या सह असंख्य नागरिक सहभागी झाले होते. संचालन आवेज खान व नागरिकांचे आभार अक्षय राजुरकर यांनी व्यक्त केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *