पुणे (जिल्हा प्रतिनिधी) :-विवेकानंद फंड
इंगळेनगर (करंजावणे, ता. शिरुर ) शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी बाजीराव इंगळे व उपाध्यक्षपदी विमल पुणेकर बिनविरोध निवड करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्था आद्य नागरिक ग्रामपंचायत सदस्या अनुसया नामदेव इंगळे, माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ नामदेव पुणेकर, माजी अध्यक्ष शरद जिजाराम इंगळे, शिवाजी बिरा डुबे, मंगल संतोष कुलाळ, सुप्रिया हनुमंत कुलाळ, तुषार कुलाळ, भानुदास इंगळे, कलाबाई पुणेकर व सर्व पालकांच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने सन २०२५ – २०२७ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष शरद इंगळे यांनी शाळा वाचनालय साठी ५००० रू. ची पुस्तके दिली. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य पुढील प्रमाणे बाजीराव बाळासाहेब इंगळे अध्यक्ष, विमल धनंजय पुणेकर उपाध्यक्ष, अमोल काळूराम पुणेकर -सदस्य, योगिता आकाश इंगळे -सदस्या, विजया भानुदास इंगळे -सदस्या, राणी यशवंत इंगळे -सदस्या, तानाजी बिरा डुंबे -सदस्य, शिवाजी बिरा डुबे -सदस्य, मनिषा विष्णू इंगळे -सदस्या, लक्ष्मी संदिप उगले -सदस्या.उत्कर्षा संजयकुमार वाळके मुख्याध्यापक व संतोष जगताप सर यांचे हस्ते नवीन अध्यक्ष व सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मा. अध्यक्ष शरद इंगळे व विद्यमान अध्यक्ष बाजीराव इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे पालक व ग्रामस्थ यांच्याकडून स्वागत करण्यात आले.