- हेटीकुंडीच्या गावकऱ्यांनी दिले वन विभागाला निवेदन.
- वन्य हिंस्र प्राण्यांपासून आम्हाला संरक्षण द्या-गावकऱ्यांची मागणी.
- जखमींच आरोग्य दुरुस्ती होईपर्यंत त्यांना नुकसान भरपाई द्या-गावकऱ्यांची मागणी.
कारंजा प्रतिनिधी:-
दिनांक २०/११/२०२५ रोज गुरुवारला रात्रीचे ९.३० वाजताचे सुमारास गावात अस्वलाचा मुक्त संचार होता. अचानक गावकऱ्यांवर अस्वलीने हल्ला चढविला, त्या हल्ल्यात गावातील ओमशक्ती साठे यांचे कडे काम करणारे गुराखी शंकर नारायण पट्टे, ज्ञानेश्वर हिंगवे व सौ. चंद्रकला वाघमारे यांचे वर हल्ला चढवीत अस्वलाने त्यांना जखमी केले. नागरिकांच्या सतर्क ते मुळे त्यांना अस्वलांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. व त्यांची जीवित हानी होण्याचे टळले याबाबत वनविभागास माहिती देण्यात आली तेव्हा वनविभागाचे कर्मचारी गावात येऊन अस्वलाचा शोध घेऊ लागले असता त्यांना गावामध्ये अस्वलांच्या पायांचे ठसे दिसले या ठसास त्यांनी चिन्हांकित केले व गावामध्ये फटकेचा आवाज केला परंतु त्यांना अस्वल त्या वेळेस गावात दिसुन आलेली नाही.
आज दिनांक २१/११/२०२५ रोज शुक्रवारला ती अस्वल सुनील उकंडे यांचे शेतामध्ये दिसुन आलेली आहे. तसेच ३ दिवसापुर्वी मनोहर गजाम यांची गाय वाघाने गावालगत ठार मारून फस्त केलेली आहे. यापूर्वी एक महिना अगोदर गजानन डोंगरे यांचे गायीवर वाघाने हल्ला केला असता त्यांनी वाघास पळविण्याचा प्रयत्न केला असता वाघाने त्यांचे पाठीवर पंज्याने जखमी केले होते. हेटीकुंडी गाव व हेटीकुंडी येथील शेतशिवार हे जंगलाने वेढलेले आहे. त्यामुळे गावातील शेतकरी व शेतमजूर कामाकरिता सतत त्या भागात वावरत असतात त्यामुळे गावातील शेतकरी व शेतमजूर यांचे मध्ये वन्यप्राण्यांन विषयी दहशत निर्माण झालेली आहे. व ते आपला जीव मुठीत घेऊन या दहशतीच्या वातावरणामध्ये शेतातील कामे करीत आहे.
वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे गावातील तरुण व वृद्ध मंडळी यांनी सकाळी फिरण्यासाठी व शारीरिक व्यायामासाठी गावाबाहेर जाणे बंद केलेले आहे. गावातील व परिसरातील लोकांना दिवसाढवळ्या कधीही वाघ, अस्वल, व इतर वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी वन परिक्षेत्र अधिकारी सावंत यांनी निवेदनाद्वारे मागणी केली की, आपण आपल्या स्तरावरून रात्रपाळीच्या वेळेला विभागाचा वनरक्षकांना गाव व परिसरामध्ये गस्त घालायला लावावी तसेच हेटीकुंडी परीसरामध्ये वाघाने व अस्वलाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची प्रकृती मध्ये सुधारणा होई तो पर्यंत वन विभाग कार्यालयाकडून त्यांना मजुरी देण्यात यावी. जेणे करून त्यांच्या मुलाबाळाना तसेच कुटुंबातील कर्ता व्यक्तीवर उपासमारीची वेळ येणार नाही याची आपल्या विभागाने त्वरित दखल घेण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदन देतांना गावकरी उपस्थितीत होते. संबंधित विभागाने व शासनाने सदर प्रकरणाची दखल न घेतल्यास गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे.