संघटन हीच मोठी शक्ती… प्रफुल्लचंद्र कुमावत

Rahul
1 Min Read

रांजणगाव गणपती  :-प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार

समाजातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेत विविध क्षेत्रात कार्यरत झाले पाहिजे आणि भावी पिढी व्यसनापासून दूर राहीली पाहीजे असे मत कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर ता. शिरूर येथे कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी पुणे जिल्हा दौऱ्यावेळी भेट दिली असता बोलताना प्रफुल्लचंद्र कुमावत बोलत होते. शैक्षणिक क्षेत्रात कुमावत यांचे योगदान खूप मोठे असून सत्कार समारंभात शैक्षणिक साहित्य स्वीकारून ते गरजू विद्यार्थ्यांना देत असतात .

याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, साहित्यिक मनोहर परदेशी, मांडवगण फराटा ग्रामपंचायतच्या माजी सदस्या हर्षदा परदेशी, मनिषा कुमावत महेश शिर्के, जितेंद्र काळोखे, दिनेश अमाप, बजरंग मुडे, रियाज शेख, सुनील सोनटके, आकाश अवसरमल यांसह आदी उपस्थित होते, 

यावेळी पुढे बोलताना पुढील काळात महाराष्ट्रात गावोगावी कुमावत संघटना बांधण्याचे व समाज मेळावा भरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी सांगितले, 

तर मुले हीच देशाची संपत्ती असून मावी पिढी सुदृढ करण्यासाठी तरुण पिढी महत्वाची असल्याचे मत सरपंच रमेश गड़दे यांनी व्यक्त केले, दरम्यान साहित्यिक मनोहर परदेशी यांनी सर्वांचे आभार मानले.

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *