नागपूरच्या शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक

Rahul
1 Min Read

 

# महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई अंतर्गत हेक्टरी साडे सात क्विंटल सोयाबीन खरेदीची मर्यादा

काटोल/प्रशांत पवार

शेजारच्या जिल्ह्यामध्ये दहा ते सतरा क्विंटल ची सोयाबीन खरेदी मर्यादा असून नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनीच महाराष्ट्र राज्य खरेदी पणन महासंघ मुंबई यांचे कोणते नुकसान केले तर त्यांना हेक्टरी साडेसात क्विंटल विक्रीची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. देशातील शेतकरी शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी एकीकडे संघर्ष करीत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या शासकीय संस्था शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करीत आहे काय असा सवाल शेतकरी संघटनेच्या वतीने होत असून यावर तोडगा लवकरात लवकर शासनाने काढावा असे मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे अन्यथा नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा नागपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटनांनी दैनिक जनप्रभात प्रतिनिधीशी बोलून दाखवले नागपूर शेजारील जिल्ह्यातील वर्धा अमरावती भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यातील खरेदी मर्यादा हेक्टरी दहा ते सतरा क्विंटल च्या वर असून फक्त नागपूर जिल्ह्यासाठीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना साडेसात क्विंटल ची हेक्टरी मर्यादा का घालून देण्यात आली असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे लोकप्रतिनिधींनी सुद्धा अजूनही या आकडेवारीकडे लक्ष का दिले नाही याचे भान त्यांना नाही काय याचे आश्चर्य व्यक्त होत आहे शेतकऱ्यांबद्दल लोकप्रतिनिधींच्या संवेदना मेल्या काय असे सुद्धा बोलून दाखवल्या जात आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *