- बोरखेडी येथील घटना, महसूल विभागाचे दुर्लक्ष
- तलाठी यांनी केला पंचनामा, तहसीलदार कार्यवाही करणार काय
- महसुल विभागाची डोळेझाक भूमिका…

आष्टी शहीद :-=प्रतिनिधी
आष्टी ते कारंजा (घा. ) मार्गांवर असलेल्या बांबरडा ग्रामपंचायत च्या हद्दीत येणाऱ्या बोरखेडी गावाजवळ असणाऱ्या वन तलावातून गाळ उपसण्याच्या नावावर महसूल विभागाच्या आशिर्वादामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून येथील तलावातून मुरूम चोरुन नेणाऱ्या वाहणाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. या घटनेची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली असून अदयापही कार्यवाही झाली नाही.
आष्टी तालुक्यातील आदिवासी बहुल गाव म्हणून बोरखेडी गावाची ओळख आहे. आष्टी पासून शेजारी तालुक्यात जाणाऱ्या रस्त्याचे काम जोरात सुरु असताना काम करणाऱ्या कॉन्स्ट्रॅकशन कंपनी ने शासनाची कोणतीही परवानगी न घेता गाळ उपसण्याच्या नावाखाली मुरूम खोदून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. गावकरी यांच्या मदतीने घटना कॅमेऱ्यात कैद करून तलाठी वं तहसीलदार यांच्या कडे चौकशी केल्यावर आणि कंत्राट दारा कडे असलेली कागदापात्रे तपासणी केल्यावर बांबरडा ग्रामपंचायत च्या अधिकार्यच्या खोट्या साह्य करून डुप्लिकेट ठराव सुद्धा कंत्राट दारानी चौकशी करताना दाखविला. कंत्राट दारानी लाखो रुपये चा गौण खनिज चोरून महसूल विभागाला लाखो रुपयाचा चुना लावला आहे. या घटनेची माहिती दिवाकर घटी यांनी तलाठी वं तहसीलदार यांना देऊन चौकशी करावी अशी मागणी लावून धरली होती. तेव्हा तलाठी बांबाळकर यांनी तात्काळ घटना स्तळं गाठून गावकरी यांना सोबत घेऊन पंचनामा केला. तहसीलदार यांना पंचनामा सादर केल्यावर काय कार्यवाही होणार हे पाहणे आता गरजेचे आहे. या कंत्रादराने गावाकऱ्यांना अंधारात ठेऊन आम्ही तलाव खोडण्याची परवानगी तहसीलदार यांच्या कडून घेतली अशी माहिती देण्यात आली होती मात्र सखोल चौकशी केल्यावर कंत्राट दाराने घटना स्तळंवरून यंत्र वं मुरूम वाहून नेणारे वाहने अचानक बेपत्ता केली तेव्हा गावाकऱ्यांना संशय आला. कंत्राट दारावर महसूल विभाग काय कार्यवाही करते हे पाहणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया :-=तलाठी पवन बांबाळकर
गावाकऱ्यांच्या तक्रारीवर मी घटना स्तळं गाठले आणि गावकर्यांना सोबत घेऊन घटना स्तळं पंचनामा करून तसा अहवाल मी तहसीलदार यांच्या सादर केला आहे.
प्रतिक्रिया :-=सुचिता धंडाळे सामाजिक कार्यकर्ता
बोरखेडी गावाजवळ असलेल्या तलावातून गाळ उपसा करीत आहे अशी बटावणी करून आम्हाला खोटी माहिती दिली. रस्त्याच्या कामात गाळाचे काय काम म्हणून चौकशी केली तेव्हा महासूल विभागातील अधिकारी यांच्या सोबत हात मिळवानी करून रात्र दिवस मुरूम उतखन होत आहे. या कंत्राट दारावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.