विष्णूभाऊ कसबे यांची मुंबई ते नागपूर पदयात्रा

Rahul
2 Min Read
  • लोह्यात शेकडो कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत 

    तालुका प्रतिनिधी:- संतोष कांबळे

    लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी अनुसूचित जातीत आरक्षण वर्गीकरण अ ब क ड जातीय वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणीच्या मागणीसाठी मुंबई ते नागपूर पदयात्रा जोमाने सुरू केली असून या मार्गावरील प्रत्येक गावातील खेड्यापाड्यातील या मार्गावरील शेतातील बांधावरील समाज बांधव विविध ठिकाणी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

    या वेळी त्यांच्या स्वागतासाठी लोहा शहरातील युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. मातंग हृदय सम्राट विष्णूभाऊ कसबे यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजी सह पुष्पहार घालून मोठ्या उत्साहात करण्यात आला.

    मुंबई ते नागपूर दरम्यान अनेक गावांतून,शहरातून पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत असून सामाजिक प्रश्न मांडण्याचा आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा हा प्रभावी मार्ग ठरतं असल्याचे दिसून येत आहे. ही पदयात्रा पुढील काही दिवसात विदर्भाच्या दिशेने पुढे सरकणार असून या मार्गातील विविध शहरात सभा, संवाद आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    लोहा शहरातील उपस्थित समाज बांधवांनी लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे व कैलास दादा खंदारे, नितीन भाऊ दोडके सह आदी कार्यकर्ते यांना पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक लढ्याला समर्थन केले. या उत्साहात लोह्यातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात होता. या वेळी गणेश दाढेल,चंदू धोंगडे, रामदास बोराडे,श्रावण लोंढे,करण सावळे,सुनिल ससाणे,आकाश खानपटे,गजानन दाढेल,शैलेश दाढेल,आकाश भालेराव,विनोद भिसे,रोहित सावळे,शिवकांत कंधारे,ओंकार घुले व किरण दाढेल,आकाश खनपट्टे, हनमंत कंधारे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *