पी आर पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी तळेगाव (शा. पं.) येथे आदिवासी स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

Rahul
2 Min Read

तळेगाव (शाम. पंत):-राजेंद्र खंडारे

आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्यसेनानी आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती येथील पी आर पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी तळेगाव (शा. पं.) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा कडून ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात आणि आदरभावाने साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाच्या राष्टीय सेवा योजना तर्फे आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयाचे संचालक डॉ विक्रांत सालोडे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कोशिश गाभने यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, “फार कमी वयात बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना एकत्र करून इंग्रजांच्या जुलमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा त्याग आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश गाडगे व प्रा. तृषा गुरनुले यांनी आपल्या प्रस्ताविकेतून ‘जनजाती गौरव दिना’चे महत्त्व व आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचे आव्हान विध्यार्थ्यांना केले.

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कणखर वक्ता डॉ विवेक पेटे यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचे वेगवेगळे दाखले देऊन त्यांचे समर्पण व देशभक्तीची प्रेरणा घेण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाच्या विध्यार्थिनी कु तनुजा देवगडे व कु प्राजक्ता चर्जन यांनी सुद्धा बिरसा मुंडा जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना च्या विध्यार्थिनी कु मधुरा राऊत व कु पायल शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु कोमल रामधम हिने केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ चेतन घुलक्से, प्रा. कृणाल टाकरखेडे, डॉ निलेश बनससे प्रा वैभव दापूरकर, श्री मोहीत ए. राउत, श्री विवेक आर. वानखडे, श्री स्वनील एन. मिठे, श्री सागर गुजलवार, श्री प्रशिक गजभिये कु. दर्शना एम. सिरभाते कु. वृषाली सी. पोतदार, कु. समृद्धी खोंडे, कु फराह खान, कु वैष्णवी घटी, कु वैष्णवी बाहे, कु तेजस्विनी मालगे, कु मोनाली चौधरी, कु श्रुती छाडी, कु शामल गुल्हाने, कु वैष्णवी लोखंडे, कु भाग्यश्री चाफले, कु श्रद्धा भोर, श्री रोषन ए. राजनेकर, श्री निखिल इजापुरे, श्री सि.डब्लु गेढे, कु. भारती नासरे तसेच ईतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *