कोराडी दिलीप येवले :-
स्पेशल ओलंपिक भारत व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे आयोजित राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा दिनांक 17 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान सॉल्ट लेक इंटरनॅशनल स्टेडियम कोलकाता (वेस्ट बंगाल) येथे आयोजित असून फुटबॉल चे भारतातील सर्वात मोठे स्टेडियम मानले जाणारे क्रिडांगण त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील दिव्यज्योती मतिमंद मुलामुलींची विशेष शाळा गुमथी ता कामठी जिल्हा नागपूर मधील विद्यार्थिनी कुमारी अमिषा पंचम कुंभरे हिने राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक (गोल्ड मेडल) व सब जुनिअर फुटबॉल प्रकारात ख़ुशी रवी भिमटे नी रजत ( सिल्वर) पदक जिकूंन इतिहास प्राप्त केला आहे. या दोघींची एकाच शाळेतून महाराष्ट्र संघात निवड झाली. या स्पर्धेत भारतातील 28 राज्यांचा समावेश होता. सदर स्पर्धेत स्पोर्ट्स स्किल व डिव्हिजनिंग नुसार असेसमेंट होऊन त्यानंतर फायनल स्पर्धेत अमिषा पंचम कुंभरे व ख़ुशी रवी भिमटे ने गोवा राजस्थान ओडिसा या टीम विरुद्ध उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सदर राष्ट्रय फुटबॉल स्पर्धेत अमिषा कुंभरे ने सदर 3 गोल करत महाराष्ट्र संघांचे कोलकाता (वेस्ट बंगाल) मध्ये नाव उंच केले. सोबत महाराष्ट्राच्या टीम मध्ये नागपूर मधील दिव्यज्योती मतिमंद विशेष शाळा गुमथी ता. कामठी जिल्हा नागपूर शाळेचे नावलौकिक केले. या अगोदर दिव्यज्योती शाळेतील 1 विध्यार्थी व 1 विध्यार्थीनी यांनी राष्टीय स्पर्धेत 2 गोल्ड व 2 सिल्वर पदक प्राप्त केले आहेत. या वर्षी पुन्हा या मोठ्या कामगिरी मुळे शाळेचे नाव महाराष्ट्र व भारतात झाले आहे. या सदर स्पर्धेत शाळेचे संचालक आशिष मोरे, शाळेचे मुख्याध्यापक पिलेश्वर मोरे तसेच कर्मशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक अंजली मोरे यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. सदर स्पर्धेकरता पात्र होण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल पदक प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत आज नागपूर जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे नावलौकिक केले आहे .या कामगिरी करिता नागपूर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर स्पर्धेकरता अमिषा कुंभरे व ख़ुशी भिमटे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय क्रीडा मध्ये सुवर्णपदक पटकविले आहे. या करिता शाळेमध्ये फुटबॉल चा सराव कॅम्प, शाळेमध्ये नियमित सराव, स्पर्धा स्किल व डिव्हिजनिंग असिस्टमेंट करिता लागणारा सराव स्पेसिफिक ड्रिल, एक्सरसाईस घेण्यात आल्या तसेच क्रीडा क्षेत्रात सफलते विषयी नियमित मार्गदर्शन करण्यात आले व राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण शिबिरात नियमित सराव केला. अमिषा च्या या यशा बद्दल वर्गशिक्षिका व ख़ुशी ची वर्ग शिक्षिका याने महत्वाची भूमिका घेतली यशाबद्दल शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक सहकारी यांनी तिचे अभिनंदन केले.
स्पेशल ऑलिम्पिक फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत दिव्यज्योती मतिमंद मुलामुलींची विशेष शाळा गुमथी येथील विद्यार्थिनीं अमिषा कुंभरे ने गोल्ड मेडल् व ख़ुशी भिमटे ने सिल्वर मेडल जिंकले
Leave a Comment