कारंजा :- कारंजा शहरातील कारंजा ते दाभा रोडवरील महावितरण कार्यालयाच्या समोर असलेल्या डबक्यामध्ये असलेल्या सांडपाण्याचे नियोजन करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी नगरपंचायत कार्यालय येथे निवेदन सादर केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यालगत असलेल्या डबक्यात सांडपाणी साचल्यामुळे वार्ड नं. १५ मध्ये दुर्गंधी पसरली आहे नगरपंचायत ला निवेदन देऊन सुद्धा यावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे येथील वार्ड नं १५ मध्ये पाणी वाहून जाणारा नाला बंद झाल्यामुळे दोन नाल्याचे सांडपाण्याचे डबके तयार झाले आहे व त्यामुळे या ठिकाणी सांडपाण्यात डुक्कर बसत असून या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .
तसेच रस्त्याने जाणाऱ्या व येणाऱ्या व आजुबाजुचे नागरीकांना या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधीचा मोठा त्रास होत आहे. याकरीता नगरपंचायत कार्यालय, कारंजा घा यांनी याबाबत नोंद घेवुन योग्य कारवाई करावी अशी मागणी प्रहार कडून करण्यात आली आहे अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे