वाघाची दहशत :तळेगाव वनविभागाने वाढविली गस्त

Rahul
2 Min Read

बोटोणा शेत शिवारात वाघ डोळ्यासमोर पाहून अवसान गळाले

आष्टी शहीद :-=प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील बांबरडा शेत शिवारालगत असलेल्या बोटोणा शेत शेत शिवारात शेतात ओलीत करीत असलेल्या सदाशिव इरखेडे या शेतकऱ्याला अचानक डोळ्यासमोर वाघ उभा पाहून आपण आता गेलो असा भास झाला. देवाकडे प्रार्थना केली देवा मला वाचव म्हणून मनात प्रार्थना करीत वाघ आणि शेतकरी एक तास आमने सामने उभे राहिले.नंतर वाघ निघून गेल्यावर शेतकरी हा अवसन गळताच जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. काही वेळाने शुद्धीवर येताच शेतकरी यांनी बोटोणा गाव गाठले आणि गावकरी यांना घडलेला प्रकार कथन केला.सविस्तर असे की,
आष्टी तालुक्यातील सीमेवर कारंजा (घा )तालुक्याची सीमा लागून आहे. याच बोटोणा शेत शिवारात वं लागत बोरखेडी वं बांबरडा येथील शेतकऱ्यांची शेती आहे. या भंगातून जांब नदी वाहत असल्यामुळे या भागात वाघ अस्वल हे वन्य प्राणी दिवस रात्र या भागात दर्शन देतात. वाघाची वं अस्वल या प्राण्याची दहशत असली तरी या भागातील बिट गार्ड हे नेहमीच गस्त देऊन शेतकऱ्यांना मदत करतात. असे असले तरी वाघ वं अस्वल हे प्राणी शेतकऱ्यांना दिवस रात्री दिसतात त्यामुळे कधी हल्ला होईल अशी मनात भीती आहे. अशी भीती बाळगून शेतकरी हे शेतात रात्र अपरात्री ओलीत करण्यासाठी जातात. जीव मुठीत घेऊन शेती कामे करीत असतात. दि. 23रोजी सकाळी 7वाजता वाघ हा अचानक समोर येऊन उभा झाला. यातून सुटका केली पण भीती मात्र कायम आहे. या घटनेची माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य शिलवंत ठाकरे यांनी वनविभाग तळेगाव यांना दिली आणि मदतीसाठी दक्षता पथक वेळीच हजर झाले. वनविभागातील कर्मचारी वेळेवर हजर होऊन फरक पडणार नाही तर शेतात फिरणाऱ्या वाघाला जेरबंद करून जंगलात सोडा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. गस्त देताना बोटोणा येथील बिट गार्ड मोहन सोडगीर, तर बाबरदा येथील बिटगार्ड कदम, तर बोरखेडी चे बिट गार्ड राम गायकवाड यांनी घटना स्तळी भेट देऊन सहकार्य केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *