ऐंजल पॅराडाईज स्कूल, केळझर येथे सविधान दिनानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रम

Rahul
3 Min Read

सेलू. प्रशांत झाडे
ऐंजल पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, केळझर येथे संविधान रॅली काढून विद्यार्थी व शिक्षकांनी न्याय, स्वतंत्र, समता व बंधुता यांचे संदेश देणारे फलक हातात धरून व नारे देऊन जनजागृती केली तसेच प्रसिद्ध व्याख्याते श्री प्रशिक आनंद यांचे ‘हमारा संविधान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करून विद्यार्थी पालक व गावकऱ्यांना संविधानाचे महत्त्व समजविण्यात आले. विद्यार्थ्यांनी संगीत व नृत्याद्वारे संविधान आणि बाबासाहेबांचे योगदान यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीद्वारे बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध जनजागृती फलकांद्वारे गावकऱ्यांना समतेने जगण्याचा मार्ग दाखविला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नरेंद्र सूर्यवंशी, प्रमुख पाहुणे पदी प्रसिद्ध व्याख्याते श्री.प्रशिक आनंद, एन. एस. फार्मसी चे प्राचार्य श्री.सागर शिरसाठ, एंजल पॅराडाईज शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी जांबुतकर व सुनीता नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य श्रीमती पौर्णिमा पाटील उपस्थित होत्या. सर्वप्रथम भारताच्या संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. केजी टू मधल्या साची रहाटे या चिमुकलीने आपल्या गोड आवाजात ‘जमलं ना कुणाला दिले ना भिमाने भारताचे संविधान’ या गीता द्वारे उपस्थितांचे मन जिंकले. रिधिमा नान्हे, अनिध्या नगराळे, स्वरांश वानखेडे व विहा मानकर या विद्यार्थ्यांनी प्रभावी शैलीत संविधानावर प्रकाश टाकला. संस्थेचे अध्यक्ष श्री नरेंद्र सूर्यवंशी यांनी संविधान हा भारतीय लोकशाहीचा मजबूत पाया असून त्याची प्रखर अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या हातात आहेत असा विद्यार्थ्यांना संदेश दिला संविधानानेच सामाजिक आर्थिक दरी दूर होऊ शकते, संविधान मनामनात टिकवण्याचे रुजवण्याचे कार्य आपल्यालाच करावयाचे आहेत असे मत वक्ते प्रशिक आनंद यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी ‘ स्वतंत्रता को बल देता है, भारत का सन्मान भारत का संविधान’ या गीतावर मनमोहक नृत्य सादर करून लोकशाही हीच देशाची ताकद आहेत हे पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्सिंग विद्यार्थी तसेच सक्षम खोबे तर आभार प्रदर्शन माही शंभरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता विद्यार्थी शिक्षक,पालक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी सहकार्य केलेत व विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये जपण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता केली.
विद्यार्थ्यांच्या जयघोषाने दमदमली केळझर नगरी
प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी नाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी केली. ‘ देश की रक्षा कोण करेंगे, हम करेंगे हम करेंगे’ ‘संविधानाची हीच ग्वाही, उच्च- नीच कोणी नाही’ अशा अनेक नाऱ्यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधले. स्वतंत्र, समता व बंधुता यांचे संदेश देणारे फलक कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *