सेलू. प्रशांत झाडे:-
नुकताच पंचायत समिती सेलू च्या वतीने ग्राम पंचायत कोपरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.यात दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के अनुदान चे वाटप , वृक्षरोपण, ग्रामपंचायत ला वनराई बंधारा बांधणे अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी देवानंद पानबुडे गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, दहेगाव, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक खोब्रागडे, श्रीमती भोयर उमेद व्यवस्थापक, बर्डीया विस्तार अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंदे, सचिव किरण वरघणे ,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , ज्योती दूधबळे, जयपूर , टाकळी चे सरपंच, उमेद चे पदाधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .
ग्रामपंचायत मधील दिव्यांगाना 5% निधी वाटप मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले. आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात आले असून शिल्लक राहिलेल्या लाभार्थी साठी कॅम्प आयोजीत करण्यात आला होता. एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षरोपण करण्यात आले.
घरकुल लाभार्थी यांना सोलर करिता बँक चे शाखा व्यवस्थापक व गट विकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. उमेद कडून लाभार्थी यांना कर्ज उपलब्ध करण्याचे कबूल केले उमेद च्या सहकार्याने ग्रामपंचायत ची गृहकर, पानिकाराची वसुली 10 गटातील महिलांनी भरली.यावेळी
ग्रामसेवक संघटना शाखा सेलू व लोक सहभागातून बंधारा बांधण्यात आला .
ग्रामपंचायत मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून नागरिकांचा उत्फुर्त सहभाग दिसून आला.
ग्रामपंचायत कोपरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिव्यांग लाभार्थ्यांना 5% अनुदान वाटप
Leave a Comment