अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Rahul
2 Min Read

*पीडित मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न*

 

*कलम 64(2)(i), 65(1), 70(2), 351(2) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल*

 

तळेगाव (शा. पं.):-

तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या भीषण प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी आजपर्यंत चार आरोपी व एक बालकास गजाआड केले असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले असून, हा अहवाल तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीतील संशयास्पद लक्षणे पाहून पुढील तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील वैद्यकीय अहवालात मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्यावर कुटुंबीयांनी तातडीने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.तक्रार दाखल होताच पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान, आरोपींपैकी एक हा अज्ञान स्थितीत असून तो पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळत आहे. त्याची कायदेशीर चौकशी संबंधित प्रक्रियेनुसार केली जात आहे.उर्वरित दोन आरोपी पळून गेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून आसपासच्या गावांमध्ये सर्व्हेक्षण वाढवण्यात आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी कलम 64(2)(i), 65(1), 70(2), 351(2) डीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने तपास अत्यंत गोपनीयतेने सुरू आहे.फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल” — पोलिसांचे आश्वासन फरार आरोपींच्या मागोव्यासाठी सर्व पथके सक्रिय असून “दोन्ही फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, तसेच सर्व आरोपीना कठोर शिक्षा होईल या दृष्टीने गुणात्मक तपास सुरु आहे, जलद गतीने तपास व्हावा या दृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार तळेगाव, POCSO सेल आर्वी व उपविभागातील अधिकारी व अंमलदार चे तपास पथक तयार करण्यात आले आहे.” असे पोलिसांनी सांगितले.सदर गुन्हात अटक आरोपीना मा.विशेष न्यायालय वर्धा यांचे समक्ष हजर करण्यात आले असून दिनांक 24/11/25 पावेतो पाच दिवसाचा पिसीआर मंजूर केला आहे.सदर प्रकरणाच्या तपासावर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन सुरु असून अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे हें पोलिस स्टेशन ला ठाम मांडून आहेत.गुन्हाचा तपास एसडीपीओ चंद्रशेखर ढोले, पोलीस निरीक्षक मंगेश भोयर व पोलीस कर्मचारी करीत आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *