विधायक कामाच्या माध्यमातून युवा नेते राजेश राठोड यांनी जनतेची मने जिंकली .

Rahul
1 Min Read

तेलगाव प्रतिनिधी:

           अन्न, वस्त्र,निवारा , आरोग्य आणि शिक्षण हया मूलभूत गरजाची सोडवणुक करणे हे शासन, प्रशासनाचे प्रथम काम असते पण बोथट झालेली यंत्रणा कुचकामी ठरल्याने युवा नेते राजेश राठोड यांच्या सारखी संवेदनशील मनाचे तरुण मात्र ही जागा भरून काढत असून पदरी कोणतेही राजकीय पाठबळ नसतानाही त्यांनी लावलेला विकासकामांचा धडका पाहण्यासारखा आहे. मुंबई या मायानगरी मध्ये एक नामांकित उद्योगपती म्हणून राजेश यांच्या नावाची स्वातंत ओळख निर्माण केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन व्यथित केलेली या युवा नेत्याला इतरांचे दुःख पाहवत नाही याचा प्रत्यय त्यांनी केलेल्या रस्त्याच्या कामावरून आला. सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतुकीच्या ये जा करतात त्या लोणावळ ते माजलगाव साखर कारखाना, लोणवळ तांडा ते सावंत वस्ती, भडूली तांडा ते साखर कारखाना या तीन हि रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चालकांना रास्त खराब असल्याने जीवघेणी कसरत करावी लागत असे हि बाब राजेश राठोड यांना समजताच त्यांनी विनाविलंब तिन्ही ठिकाणी जेसीबी च्या साह्याने रस्ते एकदम टकाटक करून हा यक्ष प्रश्न सोडविला त्यामुळे त्यांच्या विषयी सामान्य जनतेचे आशादायी वातावरण निर्माण झालेले पाहावयास मिळत आहे

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *