लहान आर्वी येथे श्री संत मारोती महाराज पुण्यतिथी महोत्सवास उत्साहात सुरुवात

Rahul
2 Min Read

ह. भ. प. सु. श्री प्रियंकाताई भोसले यांच्या मधुर वाणी होतय भागवत कथा प्रवचन

लहान आर्वी :-
प्रतिनिधी/सुनिल साबळे

आष्टी तालुक्यातील धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या लहान आर्वी गावात श्री संत मारोती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित भव्य महोत्सवास मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे.
या निमित्ताने गावात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण गाव पंढरीसारखे भासू लागले आहे.
महोत्सवाच्या प्रमुख आकर्षण म्हणून राजगड (जि. पुणे) येथील श्री टाॅकीज मनमंदीरा फेम ह. भ. प. प्रियंकाताई भोसले यांच्या मधुर वाणीतून “भागवत कथेचे” निरूपण सुरू झाले आहे. त्यांच्या ओघवत्या वाणीतील कथा, अभंग व प्रवचनांनी भाविक मंत्रमुग्ध झाले असून मोठ्या संख्येने भाविक कथा श्रवणासाठी उपस्थित राहत आहेत.
पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पासुन पहाटे सामुदायिक ध्यान,सकाळी काकड आरती,दुपारी भागवत कथा प्रवचन, संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना,हरीपाठ हरिनामाचा गजर आणि त्यानंतर रात्री , भजन टाळ-मृदंगाच्या निनादात संपूर्ण लहान आर्वी गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे.
या महोत्सवातील भागवत कथा ऐकण्यासाठी परिसरातील तसेच दूर-दूरच्या गावांतील भाविक मोठ्या संख्येने दररोज दाखल होत आहे.
श्री संत मारोती महाराज पुण्यतिथी महोत्सवामुळे लहान आर्वी गावात अध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले असून जणु काही “लहान आर्वी गावात पंढरी अवतरली आहे” असा भाविकांचा अनुभव आहे. हा महोत्सव पुढील काही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिभावात साजरा केला जाणार आहे.या सात दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचा परीसरातील भाविक भक्तांनी लाभा घ्यावा असे आवाहन श्री संत मारोती महाराज पुण्यतिथी उत्सव समितीने केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *