सेलू येथील जमदाराच्या कारला अपघात, पत्नी जागीच ठार, देवरी गोंदिया जवळ घडली घटना
सेलू – प्रशांत झाडे
सेलू पोलीस ठाण्याचे जमादार प्रशांत श्रीवास्तव वय ५० यांच्या कारला अपघात होऊन पत्नी सौ. गीता प्रशांत श्रीवास्तव वय ४५ या जागीच गतप्राण झाल्यात. तर ते गंभीर जखमी झालेत. ही घटना दि. २४ सोमवाराला दुपारी ३ वाजताच्या सुमारास देवरी जिल्हा गोंदिया येथे घडली. अशी माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली
मिळालेल्या माहितीनुसार सेलू पोलीस ठाण्यात कार्यरत हिंगणी बीटचे जमादार प्रशांत श्रीवास्तव हे पत्नीसह नातेवाईंकडे रायपूर (छत्तीसगड) येथे चारचाकी वाहनाने गेले होते. तेथून ते आज सोमवारी परत येत असताना दुपारच्या सुमारास देवरी जवळ वळण रस्त्यावर त्यांचे वाहन अनियंत्रित होऊन रोडच्या खाली जात झाडावर जाऊन आदळले. अपघात एवढा जबरदस्त होता की त्याच्या कारचे दार तुटून ते कारच्या बाहेर फेकल्या गेले. त्यांची पत्नी जागीच ठार झाली. तर त्यांच्या डोक्याला व हाताला जबर दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.