बांबरडा ग्रामपंचायत ला पडला वृक्ष लागवडीचा विसर :रोपे वाळली

Rahul
2 Min Read

*ग्रामपंचायत प्रशासक व सचिव यांचे ग्रामपंचायत कार्यालय कडे दुर्लक्ष 

*शासकीय निधी वापरून रोपे खरीदी परंतु लावण्यात कामचुकारी

आष्टी शहीद :-=प्रतिनिधी 

आष्टी तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात वसलेल्या बांबरडा ग्रामपंचायत च्या हद्दीत बोरखेडी वं बांबरडा ही दोन गावे असून या गावात आदिवासी समाज मोठया प्रमाणात आहे. याच बांबरडा ग्रामपंचायत ने वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेले रोपे लागवड न करताच पाण्याविना मेली. ग्रामपंचायत कार्यालयात तशीच पडून मारणासन्न अवस्तेत आहे.

सविस्तर असे की,

आष्टी तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात आदिवासी बहुल म्हणून बांबरडा बोरखेडी ही दोन गावे आहेत. येथील ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी श्री. रेवस्कर आहेत. या विस्तार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे बोरखेडी वं बांबरडा गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत. लाईट लावले नसल्याने गावात अंधार आहे. नाल्या तुंबल्याने गावात दुर्गंधी सुटली आहे. तर दुसरीकडे मागील वर्षी ग्रामपंचायत ने वृक्ष लागवड करायची म्हणून हजार रोपे आणून शेजारी इमारतीत आणून ठेवली. आणलेल्या रोपांना पाणी दिले नाही आणि त्या रोपाची विल्हेवाट लावली नाही. मागील वर्षी पासून त्या रोपांना पाणी दिले नाही त्यामुळे ते रोपे मेली आहे. शासन एकीकडे वृक्ष लागवड करण्यासाठी चांगले उपक्रम राबवितात तर दुसरीकडे मात्र काम चुकार अधिकारी यांना शासनाच्या उपक्रमाचे देणे घेणे नाही असे दिसते. तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी प्रशासक श्री. रेवस्कर यांनी बांबरडा ग्रामपंचायत कार्यालयात पाय ठेवला नाही अशी ग्रामस्याची ओरड आहे. शासकीय निधीतून रोपे खरेदी केली शासकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेने रोपे मेली. रोपे का लावली नाही म्हणून येथील पोलीस पाटील मोहित बगलेकर बोरखेडी चे पोलीस पाटील सौ. प्रणिता लोमटे यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत ला भेटी दिल्या मात्र ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती आष्टी येथें बसून कारभार करतात असा अनुभव आला. माजी सरपंच लता कडताई यांनी भेटी दिल्यावर विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते दौऱ्यांच्या नावाखाली दौरा असल्याचे कारण सांगून नेहमीच बेपता असतात अशी माहिती बोलताना दिली. जिल्हा मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी बांबरडा ग्रामपंचायत च्या अधिकाऱ्याची कान उघडणी करावी अशी मागणी आहे. येथील नगरिक आक्रमक असून आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *