आई… मला न्याय मिळेल का गं?

Rahul
1 Min Read

आई… मला न्याय मिळेल का गं?

आई… मी निरागस चिमणी होते

तुझ्या घरट्यातून त्या नराधमाने मला ओढून नेले

तळमळत होता माझा प्राण तुझ्या भेटीसाठी…

पण नराधमाने माझ्या शरीराचे लचके तोडले त्याच्या भुकेसाठी…

आई… मी ओरडत होते, रडत होते

नराधमाने अत्याचार करणं सोडले नव्हते 

शेवटी घेतला माझा जीव

नाही आली त्याला कीव

आई…मी अजूनही कळी होते

मला फुल व्हायचं होतं

फुल उमलायच्या आतचं 

नराधमाने कळीच खोडून टाकली

आई… तुझं घरटं माझ्या जाण्याने रिकाम झालं

तुझी चिमणी अंगणात खेळता खेळता कायमची उडून गेली

यात दोष तुझा काहीच नव्हता

दोष होता फक्त मी मुलगी म्हणून जन्मल्याचा…!

अत्याचार करणाऱ्या नराधमाला

फाशी झालीच पाहिजे

नारा देऊन हातात मेणबत्ती घेऊन 

समाज उतरेल रस्त्यावर 

प्रश्न पडला आहे माझ्या मनाला

समाजात असे नराधम असतील 

त्यांना कायद्याचा धाक नसेल

तर आई… मला खरंच न्याय मिळेल का गं ?

समाजात जिजाऊ सावित्रीच्या लेकी 

जिवंत राहतील का गं ?                                           

(गौरव साहेबराव गुल्हाने)

    शाखा व्यवस्थापक

               आष्टी

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *