बळीराजाच्या जलवाहिनी वर कुऱ्हाडीचे घाव

Rahul
1 Min Read

अज्ञात व्यक्तीने तोडले कुऱ्हाडीने ओलिताचे पाईप 

कारंजा( घाडगे ):-

कारंजा घाडगे तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी शेतकरी रसिक आत्माराम डोंगर देव यांचे मौजा बोदर ठाणा शिवारात गावाला लागून चार एकर शेत असून त्यांच्या शेताजवळील शेतकरी विष्णू पठाडे यांनी रसिक डोंगर देव यांच्या विहिरीचे शेतातील गहू पिकासाठी पाणी घेऊन अर्ध्या उत्पन्न हीशाने (बटाईने) दोघां मिळून विष्णू पठाडे यांच्या शेतात गहू पेरलेला त्यासाठी एकूण 35 स्पिंकलर पाईप टाकलेलेअसून दिनांक 18 नोव्हेंबर 2025 ला कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने त्यापैकी काही पाईप कुऱ्हाडीने तोडून शेतकऱ्याचे पाईपलाईनचे तुकडे पाडून व गहू पिकाचे नुकसान केले आहे ही घटना या शिवारात यापूर्वी सुद्धा अनेकदा घडलेली असून अज्ञात व्यक्ती रात्रीच्या ओलीताचा फायदा घेऊन अनेक शेतकऱ्याला अशाप्रकारे त्रास देत आहे याबाबत सविस्तर चौकशी करण्याकरिता व अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन अज्ञात व्यक्तीला शिक्षा व्हावी म्हणून कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *