वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ 

Rahul
1 Min Read

 

लोणी प्रतिनिधी:- कैलास गायकवाड

आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथील पठार भागात ज्वारी आणि बटाटा पिके जोमात आली असताना वन्यप्रण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. डोंगराळ भौगोलिक रचना, दाट झाडी आणि सुरक्षि दडण मिळल्यामुळे रानडुकरे, तरस, कोल्हे, हरणे या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून हे प्राणी टोळ्यांनी येऊन शेतात धुडगूस घालत आहेत.

  मे महिन्या पासून चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी योग्य अंदाज घेऊन पिकांची लागवड केली. सध्या हि पिके जोमात आली आहेत. मात्र रानटी प्राणी सतत शेतात घुसून ज्वारी आणि बटाटा पिकांची मोठ्या प प्रमाणावर हानी करत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे.आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करून पहात आहेत. तरीही रानटी प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळ समस्या अधिकच तीव्र झाली आहे. या परिस्थितीत वन विभागाने तातडीने लक्ष घालून रानटी प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान वाघ, सरपंच मच्छिंद्र शिवराम वाघ, उपसरपंच कैलास वाघ व स्थानिक शेतकर्यांनी केली आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *