वसंत आवटे ,सेलू प्रतिनिधी
परभणी येथे केलेल्या भाषणादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी, सेलू मंडलतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. सपकाळ यांच्या विधानाविरोधात त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.
सेलू शहरात झालेल्या या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी तालुकाध्यक्ष गणेश काटकर, तालुका उपाध्यक्ष नामदेव आवटे, श्याम चाफेकर, भागवत दळवे, शिवहरी शेवाळे, डॉ. गणेश थोरे, लक्ष्मण बोराडे, नानासाहेब वनवे, वेंकटेश भिसे, सुदामराव गुटाळ, मनीष कदम, भाऊ सोनवणे, विनोद बोराडे, साईराज बोराडे, कृष्णा काटे, प्रशांत ठाकूर, दीपक कोल्हाळ, मारुती चव्हाण, सतीश कापसे, निखिल पहाडे, नितीन चव्हाण, विवेक बोंडे, विष्णू इंगोले, गोविंद शिंदे, पप्पू शिंदे, गणेश सवने, अजित मोगल, रमेश तारडे, दामोदर काकडे, सुबोध काकडे, शुभम साळवे, प्रभाकर सुरवसे, बाळासाहेब काजळे, तडवी रहमत, अली खान, मुनीर मिर्झा, त्रिंबक पितळे, दत्ता तांबे, माऊली ताठे, संजय भाग्यवंत, दत्ता गिरी, सुंदर बरसाले, रामप्रसाद हजारे, कुणाल बुरेवार, प्रसाद खारकर, रामा डख, प्रभाकर गिराम, गणेश भिसे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी अपशब्द वापरणे हे राजकारणातील शिष्टाचाराला धरून नसल्याचे मत व्यक्त केले. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.